दादर ते वरळी, नेहरू तारांगण बससेवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2017

दादर ते वरळी, नेहरू तारांगण बससेवा


मुंबई । प्रतिनिधी 31 Oct 2017 -
प्रवाशांच्या मागणीनुसार शिवसेनेच्या नगरसेविका प्रिती पाटणकर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर बेस्ट उपक्रमाने मंगळवारपासून दादर ते वरळी आणि दादर ते नेहरू तारांगण असे दोन नवे बसमार्ग सुरु करण्यात आले. या नव्या बसमार्गांचे उदघाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सदा सरवणकर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ आदी उपस्थित होते.

दादर पश्चिम येथून बसक्रमांक ५६ वरळी आगारासाठी सुटणार असून बसमार्ग क्रमांक १५१ ही बस नेहरू तारांगणसाठी सुटणार आहे. बसमार्ग ५६ साठी पहिली बस ६.२० ला सुटेल. तर शेवटची बस ९.३० ला सुटेल. बसमार्ग क्रमांक १५१ साठी पहिली बस नेहरु तारांगणसाठी बस ८ वाजता सुटेल. आणि दुपारी १२ वाजता शेवटची बस असेल. तर दुपारी ४ वाजून ३० मिनीट पहिली तर ६.४० वाजता शेवटची बस असणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून दादर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली असल्याने हा परिसर मोकळा झाला आहे. याचा फायदा उठवत स्थानिक नगरसेविका प्रीती पाटणकर यांच्या मागणीनुसार जनतेच्या सोयोसाठी बेस्ट प्रशासनाकडन ह्या या दोन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. हे दोन नवीन बसमार्ग सुरू केल्याबद्दल नागरिकांनी बेस्टचे आभार मानले आहेत. तसेच शेअर टॅक्सीला देखील या नव्या बस मार्गामुळे पर्याय उपलब्ध झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या जात आहेत.

Post Bottom Ad