नरेंद्र मोदी यांच्यासाठी लसीकरणाच्या तारखेत बदल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 October 2017

नरेंद्र मोदी यांच्यासाठी लसीकरणाच्या तारखेत बदल

मुंबई | प्रतिनिधी -
देशभरात लहान मुलांच्या लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या मिशन इंद्रधनुष्यच्या पहिल्या टप्याच्या तारखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बदलण्यात आल्या आहेत. येत्या 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान सर्वत्र मिशन इंद्रधनुष्य राबवले जाणार होते. मात्र मोदी या मिशनच्या अनुषंगाने देशाला संबोधित करणार आहेत. त्यासाठी मोदी यांनी 8 ऑक्टोबर हि तारीख निश्चित केली आहे. यामुळे आता हे मिशन 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान राबवले जाणार आहे.

मिशन इंद्रधनुष्यच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने केलेल्या तयारीबाबतची माहिती उपायुक्त सुनील धामणे, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी शांताराम नाईक, डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डॉ. परेश कंथारिया यांनी पत्रकारांना दिली. यावेळी मुंबईतील जोखीमग्रस्त भागांमधील एकूण 1 लाख 75 हजार 877 बालके लसीकरणासाठी शोधली आहेत. त्यापैकी अद्याप 964 मुलांना एकदाही लसीकरण करण्यात आलेले नाही. तर 19 हजार 550 मुलांना काही प्रमाणात लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 9 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणाऱ्या मिशन इंद्रधनुष्य दरम्यान 20 हजार 279 बालकांना तर 3215 गर्भवती महिलांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहीत देण्यात आली.

मिशन इंद्रधनुष्य मोहीम ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान कार्यरत राहणार आहे. मुंबईत 65 टक्केच लसीकरण केले जात होते. आता सन 2018 पर्यंत 90 टक्केचा आकडा गाठण्याचा संकल्प पालिकेने केला असल्याची माहिती डॉ. कंथारिया यांनी दिली. यासाठी या कार्यकाळात पालिका झोपडपट्टी, बांधकामे, अतिदुर्गम भाग, डोंगराळ भाग इत्यादी भागांमध्ये 538 विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. लसीकरणामुळे बाल मृत्य व प्रसूतीदरम्यान होणारे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य होणार आहे.

असे राबवणार ‘मिशन इंद्रधनुष्य’ -
मुंबईतील २०८ केंद्रे, १६ महापालिका रुग्णालय, ५ मोठी रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे आणि १७२ इतर दवाखाने अशा ५३८ केंद्रांवर ही मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये शून्य ते दोन वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती महिलांना आवश्यक त्या लसी दिल्या जाणार आहेत. यासाठी पालिकेच्या ३७०० आरोग्य सेविका, ‘आशा’ कार्यकर्त्या आदींच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे.

लसिकरण कार्ड ‘आधार’शी जोडणार -
मुंबईतील अनेकजण कामानिमित्त स्थलांतर करीत असल्यामुळे संबंधित मुलांचे पुढील लसिकरण होत नाही. या पार्श्वभूमीवर आगामी काळात माता-बाळाचे लसिकरण कार्ड लवकच ‘आधार’ कार्डशी लिंक करण्याचाा मानस यावेळी अधिकार्‍यांनी व्यक्त केला. यामध्ये कार्डवर १५ अंकी डिजिटल क्रमांक दिला जाईल. या मुलाने कुठेही लसिकरण केले तरी संबंधित विभागाच्या अधिकार्‍याला त्याची माहिती मिळेल. त्यामुळे एकही मूल लसिकरणापासून वंचीत राहणार नाही, असा विश्वास अधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त केला.

Post Bottom Ad