चेन्नई एक्सप्रेसमध्ये बॉम्बची धमकी देणाऱ्याला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2017

चेन्नई एक्सप्रेसमध्ये बॉम्बची धमकी देणाऱ्याला अटक


मुंबई - चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या इसमाला 'जीआरपी' पोलिसांनी अटक केली आहे. अजय कुमार चौबे (३८) असे या इसमाचा नाव असून त्याने दारूच्या नशेत धमकी दिल्याची माहिती मध्य रेल्वे 'जीआरपी'चे डीसीपी समाधान पवार यांनी दिली.

रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)च्या १८२ हेल्पलाईनवर ११ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता एक कॉल आला. या कॉलद्वारे चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. फोन येताच ही गाडी कल्याण स्थानकात तात्काळ थांबवण्यात आली. त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफने गाडीची कसून तपासणी करण्यात आली. त्यानांतर तब्बल २ तासांनी गाडीला सोडण्यात आले.

आरपीएफच्या हेल्पलाईनवर आलेल्या कॉलमुळे खळबळ उडाली होती. या कॉलचा तपास कल्याण जीआरपीसह लोकल क्राईम ब्रँच (एलसीबी) करत होती. आरपीएफच्या हेल्पलाईनवर ज्या फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्या फोनचा माहिती घेत 'एलसीबी'चे अधिकारी ठाण्यातील सुहास देशमुख (६६) यांच्या दुकानात पोहोचले. त्यांनी हा नंबर त्यांचा नोकर अजय चौबे (३८) वापरत असल्याचं सांगितले. त्यानंतर 'एलसीबी'ने अजय चौबेला पकडले आहे.

११ ऑक्टोबरला चौबे खूप दारू प्यायला होता. दारूच्या नशेतच त्याने चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्बच्या धमकीचा फोन केल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या फोन नंबरवरून हा फोन करण्यात आला. तो नंबर अजय काम करत असलेल्या दुकानाचे मालक सुहास देशमुख यांच्या नावावर होता. सध्या या दोघांनाही कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिल्याची माहिती, मध्य रेल्वे 'जीआरपी'चे डीसीपी समाधान पवार यांनी दिली.

Post Bottom Ad