मुंबई । प्रतिनिधी 30 Oct 2017 -
मुंबई महापालिकेचा अर्थसंसंकल्पातील निधी खर्च होत नाही अशी टिका दरवर्षी होत असते. यावर्षी मात्र अर्थसंकल्पातील अंदाजानुसार भांडवली खर्चाच्या तरतुदींसाठी असलेल्या ८,१२१.५८ कोटी रुपयांच्या रकमेपैकी ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत सुमारे २३.७९ टक्के म्हणजेच १,९३१.९९ कोटी रुपये एवढी रक्कम खर्च झाली आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात भांडवली खर्चासाठी १२,९५७.८३ कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली होती. ज्यापैकी १,३१०.७५ कोटी रुपये म्हणजेच १०.१२ टक्के भांडवली खर्च ३० सप्टेंबर २०१६ पर्यंतच्या पहिल्या सहामाहीत झाला होता. यातही विशेष नोंद घ्यावी अशी बाब म्हणजे पालिकेच्या महत्त्वाच्या खात्यांशी संबंधित विकास कामे जोमाने सुरु असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भांडवली खर्चाच्या विनियोगात लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पर्जन्यजल वाहिन्या खाते ६३.९९ टक्के, विकास नियोजन खाते ६३.९४ टक्के, प्रमुख रुग्णालये ५६.६६ टक्के, रस्ते व वाहतूक खाते ४१.५४ टक्के, पूल खाते २८.२० टक्के, प्राथमिक शिक्षण २२.२५ टक्के, सार्वजनिक आरोग्य खाते १३.५८ टक्के, घनकचरा व्यवस्थापन खाते ९.५५ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग पहिल्या सहामाही दरम्यान करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या वित्त खात्याद्वारे देण्यात आली आहे.
महापालिकेच्या यावर्षीच्या वास्तवदर्शी अर्थसंकल्पाचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या स्तरावर सातत्याने संनियंत्रण करण्यात येत असून त्यासाठी नियमितपणे आढावा बैठका देखील घेतल्या जात आहेत. या बैठकांना अतिरिक्त आयुक्त व संबंधित उपायुक्त् यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख देखील उपस्थित असतात. तसेच प्रत्येक बैठकीत निर्धारित कृती आराखड्यानुसार झालेली कामे व करावयाची कामे यांचाही आढावा घेतला जात असतो. चालू आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये रस्ते व वाहतूक खात्याच्या १०७८.६१ कोटी रुपयांची तरतूद भांडवली खर्चासाठी करण्यात आली आहे.यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ४४८.०५ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ४१.५४ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात रस्ते व वाहतूक खात्याच्या भांडवली खर्चासाठी २८८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ३४.६० कोटी,अर्थात १.२० टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती.
विकास नियोजन खात्याशी संबंधित भांडवली खर्चासाठी ५५१.५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ३५२.६४ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ६३.९४ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात विकास नियोजन खात्याच्या भांडवली खर्चासाठी ७२२.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत १५८.९३ कोटी, अर्थात २२ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती. प्राथमिक शिक्षण विषयक भांडवली खर्चासाठी ३५८.०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ७९.६६ कोटी रुपये म्हणजेच सुमारे २२.२५ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३२४.५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
सार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित भांडवली खर्चासाठी ११८.६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत १६.११ कोटी रुपये म्हणजेच सुमारे १३.५८ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात २१९.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या भांडवली खर्चासाठी १९१.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत १८.३० कोटी रुपये म्हणजेच सुमारे ९.५५ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे. तर मागील आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात याच खात्यासाठी २३७.३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत १८.७९ कोटी, अर्थात ७.९२ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती. पर्जन्यजल वाहिन्या खात्याशी संबंधित भांडवली खर्चासाठी ४४६.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत २८५.६५ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ६३.९९ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.