पालिका रुग्णालयातील डॉक्टर परिचारीकांची पदे भरणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2017

पालिका रुग्णालयातील डॉक्टर परिचारीकांची पदे भरणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत असुविधा व डॉक्टरांची कमतरता असल्याने लवकरच 852 परिचारिकांची (नर्सेस) भरती केली जाणार आहे. तसेच डॉक्टरांचाचीही 116 नवीन पदे भरली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सभागृहात दिली.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत असुविधा, पुरेसा डॉक्टर नसल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. पश्चिम उपनगरांतल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर कमी असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांत भरती व्हावे लागते, अशा सातत्याने तक्रारी पालिकेकडे मांडल्या जात होत्या. नगरसेवकांक़डूनही यावर सभागृहात आवाज उठवण्यात आला. डॉक्टरांसह नर्सेसच्या जागाही भरल्या जाव्यात अशी मागणीही करण्यात आली होती. उशिरा का होईना, याकडे प्रशासनाने लक्ष वेधल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये होती. दरम्यान पालिका रुग्णालयांत नर्सेस व डॉक्टरांची पदे भरली जाणार आहेत, शिवाय सद्या असलेल्या 5,400 बेड्समध्ये अजून 722 बेडसही वाढवल्या जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कुंदन यांनी सभागृहात दिली. पालिकेच्या या निर्णय़ामुळे सर्वसामान्य रग्णांना दिलासा मिळणार आहे.

Post Bottom Ad