एल्फिस्टन दुर्घटनेनंतर शिवसेना भाजपात आरोप प्रत्यारोपाचा "सामना" - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2017

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर शिवसेना भाजपात आरोप प्रत्यारोपाचा "सामना"


आशिष शेलारांनी राजकारणातून सन्यास घ्यावा - महापौर
मुंबई । प्रतिनिधी - 
पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानक पुलावरील चेंगराचेंगरी झालेल्या दुर्घटनेत २३ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. २३ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असताना सर्वत्र शोक व्यक्त केले जात असताना राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना आणि भाजपाने मात्र या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरु केला आहे. दुर्घटना घडून २३ प्रवाश्यांचा मृत्यू गेला असताना सत्तेत असलेले दोन्ही पक्ष आपण असंवेदनशील असल्याचे दाखवत असल्याने नागरिकांत या प्रकाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

२९ सप्टेंबरला एलफिन्स्टन रोड दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला असताना त्याच दिवशी भाजपाचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी आपला गरबा बंद केल्याची माहिती पत्रकारांपर्यंत पोहचवली. भाजपाने मृतांना श्रद्धांजली म्हणून गरबा रद्द केल्याचा संदेश मिडियापर्यंत गेला. मात्र त्याच वेळी भाजपाचे नेते खासदार किरीट सोमय्या हे गरबा खेळण्यात व्यस्त होते. तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. किरीट यांचे चिरंजीव व नगरसेवक नील सोमय्या यांनी या गरब्याचे आयोजन केले होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेने प्रमाणेच किरीट सोमय्या यांच्या गरबा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही टिका केली आहे. किरीट सोमय्या यांचे गरबा प्रकरण भाजपच्या अंगाशी आले आहे. सोमय्या यांच्यामुळे भाजपालाही टिकेला सामोरे जावे लागले आहे. खुद्द आशिष शेलार याना संवेदनशील नेतृत्वाने संवेदनशील असले पाहिजे. गरबा खेळणाऱ्यांनी संवेदनांचा विचार करायला हवा असे खडे बोल शेलार यांनी सोमय्या यांचे नाव न घेता सुनावले आहेत.

याचवेळी सोमय्या यांच्यामुळे घायाळ झालेल्या भाजपाने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या माध्यमातून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. एल्फिस्टनची दुर्घटना घडली त्यादिवशी महापौरांनी परदेशी फुटबॉलपटूंना महापौर बंगल्यावर पार्टी दिल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला आहे. ही पार्टी देतानाही संवेदनशीलता असायला हवी होती असे शेलार यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या यांच्यावरील आरोपाचा बदला घेण्यासाठी शेलार यांनी महापौरांवर संवेदनशील नसल्याचा व पार्टी केल्याचा आरोप केला आहे. महापौर विश्वनाथ माहाडेश्वर यांनी मात्र आरोप फेटाळून लावला आहे. शेलार यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे अन्यथा राजकारणातून सन्यास घ्यावा असे आव्हान महापौरांनी दिले आहे.

आशिष शेलारांनी राजकारणातून सन्यास घ्यावा - महापौर
मुंबईच्या महापौरांबद्दल आकर्षण असल्याने ब्राझ‌लिचे फुटबॉलपटू भेटण्यासाठी आले होते. परंतु दुर्घटनेचे गांभीर्य राखत आपण बंगल्यावर रोषणाई किंवा कोणताही बडेजावपणा केला नाही. केवळ पाहुण्यांचे स्वागत केले, हा कार्यक्रम काही महिने आधीच ठरलेला होता. परदेशी खेळाडूंसाठी कोणतीही मेजवानी दिली नाही. पाहुणे आले म्हटल्यावर चहा - नाष्टा देणे, हा सौजन्याचा भाग आहे. त्याप्रमाणे केवळ नाष्टा दिला. असंवेदनशील सोमय्या यांचा गरबा उजेडात आला. ते झाकण्यासाठी आशीष शेलार यांनी टीका केली. मुंबईत काय घडले याचे भान आहे. म्हणूनच दुर्घटना समजल्याबरोबर जखमींची विचारपूस करण्यासाठी गेलो. त्यामुळे शेलार यांनी आपल्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे अन्यथा त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई

Post Bottom Ad