पडलेला चर्नी रोड़ ब्रिज बनवण्यासाठी महापालिकेविरोधात निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2017

पडलेला चर्नी रोड़ ब्रिज बनवण्यासाठी महापालिकेविरोधात निदर्शने


मुंबई | प्रतिनिधी 23 Oct 2017 -
चर्नी रोड़ स्टेशनवर सध्या पड़लेल्या फुटओव्हर ब्रिजला पुन्हा बनविण्याची मागणी करीत भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी महानगरपालिकेविरुद्ध निदर्शने केली. ताड़देव येथील नगरसेविका सरिता पाटील, गिरगाव येथील नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदार, खेतवाड़ी येथील नगरसेविका मीनल पटेल आणि मलबार हिल भाजपा अध्यक्ष श्वेता मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शांतीपूर्ण निदर्शनात जवळपास 300 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

चर्नी रोड़ येथे फुटओव्हर ब्रिज तुटल्यामुळे प्रवाशांचा संपूर्ण संपूर्ण भार उत्तर बाजुस असलेल्या ब्रिजवर पडला आहे. मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांनी याबाबत मनपा तसेच रेलवे अधिका-यांबरोबर बैठक घेतली होती, ज्यामध्ये एलफिंस्टन सारखी दुर्दैवी घटना पुन्हा घड़ू नयेत, म्हणून चर्नी रोड़ येथे लवकरात लवकर तजवीज करण्याती मागणी केली होती. चर्नी रोड़ स्टेशनच्या पूर्वेस बाहेर पडण्यासाठी एकच ब्रिज असल्याने लोकांना अधिक त्रास होत आहे. या बैठकीत आमदार लोढ़ा यांनी महानगरपालिकेस चेतावनी दिली की, ब्रिजचे काम लवकरात लवकर चालू न केल्यास पुढ़े मोठे आंदोलन केले जाईल.

सोमवारी नाना चौक येथील डी वॉर्ड कार्यालयात भाजपा तर्फे झालेल्या या शांततापूर्ण प्रदर्शनात तीन नगरसेविका तसेच भाजपा अध्य़क्ष यांनी आपल्या मागणी घेऊन महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनां विनंती अर्ज देऊन जनतेच्या भावना मांडल्या. या मोर्चामध्ये दक्षिण मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद चिंतनकर, भाजपाचे महामंत्री नरेंद्र भंडारी सहीत अजय चौरसिया, प्रमोद जैन, अजय पाटील, गौरव तेंडुलकर, रवींद्र करंजगावकर, शाहरुख बिलिमोरिया, प्रशांत राऊल इतर भाचपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Bottom Ad