मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवड़णूकीत भाजप उमेदवार जागृती पाटील या विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेचे स्थानिक आमदार अशोक पाटील यांची पत्नी मिनाक्षी पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. जागृती पाटील यांना 11,229 तर मिनाक्षी पाटील यांना 6337 मते मिळाल्याने मिनाक्षी पाटील यांचा 4892 मतांनी पराभव झाला. मिनाक्षी पाटील यांचा याच प्रभागात दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. या आधी मिनाक्षी पाटील यांचा जागृती पाटील यांच्या सासू प्रमिला पाटील यांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 500 मतांनी पराभव केला होता. भांडूपच्या प्रभाग क्रमांक 116 मधील काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांचे निधन झाल्याने ११ ऑक्टोबरला पोटनिवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीत सात उमेदवार रिंगणात असले तरी शिवसेना आणि भाजपामध्ये खरी लढत होती. याठिकाणी 19269 हजार जणांनी मतदान केल्याने 50.64 टक्के मतदान झाले. या पोटनिवडणुकीची आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासून जागृती पाटील या मीनाक्षी पाटील यांच्या पुढे होत्या. ही बढ़त जागृती यांनी शेवट पर्यंत कायम राखली. मतमोजणीच्या अखेरीस जागृती पाटील याना 11129 हजार तर मीनाक्षी पाटील याना 6337 हजार मते मिळाली. मिनाक्षी पाटील यांचा 4892 मतांनी पराभव झाला. ही निवडणूक शिवसेनेसह भाजपनंही प्रतिष्ठेची केली होती.
जागृती पाटील या मुळ काँग्रेसी आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या जागृती या सुनबाई आहेत. प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे या वार्डमध्ये पोटनिवडणूक लागली होती. ही संधी साधत भाजपने प्रमिला यांच्या सुनबाई जागृती यांनी पक्षात प्रवेश देवून त्यांनी उमेदवारी दिली होती. प्रमिला पाटील यांच्या निधनाने सहानभूती निर्माण झाली असतानाच भाजपाने त्यांचा मुलगा प्रतिक व सुन जागृती या दोघांना भाजपात प्रवेश दिला होता. प्रतीक व प्रमिला पाटील यांना भाजपात प्रवेश देण्याची भाजपाची रणनीती यशस्वी ठरली आहे. स्थानिक शिवसेना आमदार अशोक पाटील यांच्या विरोधातील असंतोष यावेळी पुन्हा एकदा दिसून आला. मागील निवडणुकीतही काही नाराज शिवसैनिकांनी काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांना मतदान केले होते, याही वेळेला शिवससैनिकांनी मिनाक्षी पाटील यांना मतदान केल्याचे दिसत नाही. मागील वेळी मिनाक्षी पाटील यांना 7857 मते मिळाली होती. यावेळी हि संख्या कमी होऊन यावेळी 6337 मते मिळाली आहेत.
दरम्यान भाजपाचे 82 नगरसेवक होते. भाजपाच्या नगरसेविका व माजी महापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे भाजपाची संख्या 81 झाली होती. जागृती पाटील यांच्या आजच्या विजयामुळे भाजपचे महापालिकेतील संख्याबळ एकने वाढून पुन्हा 82 झाले आहे. गिरकर यांच्या जागी पोटनिवडणूक होउन ही जागाही भाजपाने जिंकल्यास भाजपाची संख्या 83 होणार आहे. शिवसेनेचे सध्या 84 नगरसेवक आहेत. भाजपा आणि शिवसेनेची संख्या समसमान होणार असल्याने येत्या 2019 च्या महापौर निवडणूकीत घोड़ेबाजार तेजीत चालणार आहे.
उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवार नाव मिळालेली मते
गजधने वैशाली सतीश 206
दीपिका विजय जाधव 51
अॅड. स्मृती तुळशीदास जाधव 49
जागृती प्रतीक पा 11129
मिनाक्षी अशोक पाटील 6337
बेबीताई सावंत 339
प्रमिला प्रेम सि 972
नोटा 213
एकूण 19296
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना अपक्षांसह – 88
भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 85
कॉंग्रेस – 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
मनसे – 7
सपा – 6
एमआयएम – 2