भांडूप पोटनिवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे हाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 October 2017

भांडूप पोटनिवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे हाल


मुंबई । अजेयकुमार जाधव -
भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस पक्षाच्‍या तत्‍कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर आज (11 ऑक्‍टोंबरला) रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्माचाऱ्याना राहायची आणि खाण्याची सोय नसल्याने कर्मचाऱ्यांचे हाल झाले आहेत.

भांडूप पोटनिवडणूकीसाठी सात ठिकाणी मतदान केंद्रांवर प्रक्रिया राबवली जात आहे. निवडणूकीसाठी पिआरओ, सहाय्यक पिआरओ, क्षेत्र अधिकारी, शिपाई इत्यादींची प्रत्तेकी 36 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कांजूरमार्ग येथील डॉकयार्ड कॉलनीमधील न्यू इंग्लिश स्कूल येथील दोन मतदान केंद्रावर प्रत्तेकी सहा कर्मचारी अधिकारी नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी 10 ऑक्टोबरला दुपारी 1.30 वाजता मतदान केंद्रावर आले. या कर्मचाऱ्यांची राहण्याची याच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी मच्छरची समस्या आहे, शौचालयात दुर्गंधी आहे, रात्री राहण्यासाठी सुयोग्य जागा नाही, रात्रीच्या जेवणाची व्यवस्था काय आहे ते माहित नाही, बाहेरून जेवण घेवून या असे या कर्मचाऱ्याना सांगण्यात आले आहे. अशीच परिस्थिती पोलिस कर्मचाऱ्यांची असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस पक्षाच्‍या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर 11 ऑक्‍टोंबर 2017 रोजी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी 21 हजार 668 पुरुष व 16 हजार 437 स्त्रिया‍‍ असे एकूण 38 हजार 105 मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजाविणार आहेत. सर्वात कमी भांडूप पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शालेमधील 966 मतदार मतदान करणार असून सर्वात जास्त पवईच्या मनपाच्या शालेत 1580 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 116 मधील सात ठिकाणी 29 मतदान केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त संतोषकुमार धोंडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोटनिवडणूकीची जय्यत तयारी करण्‍यात आली आहे. या निवडणूकीसाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावित असून यामध्‍ये मुख्‍य लढत ही शिवसेना पक्षाच्‍या मिनाक्षी अशोक पाटील व भाजप पक्षाच्‍या जागृती प्रतीक पाटील यांच्‍यामध्ये होत आहे. मतमोजणी 12 ऑक्‍टोंबर रोजी ‘एस’ विभाग कार्यालयात करण्‍यात येणार आहे.

Post Bottom Ad