मुंबई । प्रतिनिधी 24 Oct 2017 -
बेस्ट समितीच्या बैठकीला महाव्यवस्थापाक उपस्थित नसल्याने बैठक तहकूब करण्याची पाळी समितीवर आली. बेस्ट समितीची सभा महाव्यवस्थापक उपस्थित न राहिल्याने तहकूब करण्याचा प्रकार बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे.
बेस्ट समितीच्या बैठकीआधी महाव्यवस्थापकांना तीन वेळा सभा सुरु करायची आहे आपण बैठकीला यावे असे संदेश देण्यात आले. समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्षांच्या आधी महाव्यवस्थापकांना उपस्थित राहावे लागते. मात्र दोन वाजताच्या सभेला अडीच वाजले तरी महाव्यवस्थापक आले नाहीत. याकारणाने सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त करत सभा ताझुकूब करण्याची मागणी केली. सभातहकुबीची सूचना शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांनी मांडली त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्याने अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सभा तहकूब केली. सभा तहकुब करतानाच महाव्यवस्थापक सुरेन्द्र बागडे हे समिती कक्षात आले मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केली नसल्याने सभा तहकूब केल्याची माहिती अनिल कोकीळ यांनी दिली.