बेस्टच्या आर्थिक परिस्थितीमुळे सदस्यांनी मानधन परत केले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2017

बेस्टच्या आर्थिक परिस्थितीमुळे सदस्यांनी मानधन परत केले


मुंबई । प्रतिनिधी 24 Oct 2017 -
बेस्टची आर्थिक परिस्थिती खराब असून बेस्टवर करोडो रुपयांचे कर्ज आहे. बेस्टला आर्थिक परिस्थितून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नाला मदत म्हणून बेस्ट समितीमधील भाजपा सदस्यांनी मानधन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्टवर 4 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून बेस्टने नुकताच सन 2018 - 19 चा 890 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बेस्टला महापालिकेकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बेस्टने आपला कारभार सुधारावा असा सल्ला पालिका आयुक्तांनी दिला आहे. बेस्टला महापालिकेकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित सांगता येत नसले तरी भाजपा सदस्यांनी मात्र बेस्टचा खर्च कमी करण्यासाठी मानधन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजपाचे सुनील गणाचार्य, नाना आंबोले व श्रीकांत कवठणकर या सदस्यांनी आपल्या मानधनाचे चेक बेस्ट महाव्यस्थापक सुरेंद्र बागडे यांना परत केले आहेत, इतकेच नव्हे तर या तीनही सदस्यांनी त्यांना देण्यात आलेले बेस्ट बस पासही परत केले आहेत. आम्ही तीन सदस्यांनी मानधनाचे चेक आणि बसपास परत केले असून आम्ही जो बेस्ट पर्यंत बेस्ट समितीमध्ये आहोत तो पर्यंत कुठलेही मानधन घेणार नसल्याचे नाना आंबोले यांनी सांगितले. शिवसेनेचे सदस्य राजेश कुसळे यांनीही आपण आपल्या मानधनाचा चेक परत करत असल्याचे सांगितले. तर बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी बेस्ट समितीमधील कोणताही नामनिर्देशित सदस्य मानधन घेणार नसल्याचे सांगितले.

Post Bottom Ad