बेस्ट कर्मचाऱ्यांना 5 हजार पाचशे रुपये बोनस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 October 2017

बेस्ट कर्मचाऱ्यांना 5 हजार पाचशे रुपये बोनस


मुंबई । प्रतिनिधी - 
बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नाही अशी भूमिका पालिका आयुक्तांनी घेतली होती. यामुळे कर्मचारी संघटनानी उपोषण सुरु करून भाऊबीजच्या दिवशी संप करण्याचा इशारा दिला होता. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने संपाचा इशारा इशारा दिला असतानाच आज महापौरांकडे झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना 5 हजार 500 रुपये बोनस देण्याचे महापौरांनी जाहीर केले आहे. यासाठी पालिका बेस्टला 25 कोटी रुपये देणार असून हि रक्कम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कशी द्यायचे हे बेस्ट प्रशासनाने ठरवायचे आहे असे महापौरांनी सांगितले. यावेळी महापौरांच्या सोबत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ सोबत होते.

बेस्टची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचारी संघटना दिवाळीसाठी बोनस मिळावा, यासाठी आग्रही आहे. आर्थिक स्थितीमुळे बेस्ट बोनस देण्याच्या स्थितीत नाही. कायदेशीर अडचणींमुळे महापालिकेलाही बेस्टला थेट मदत करण्यात अडचणी आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका बोनस ऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरुपात (Advance) कर्ज म्हणून, सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देण्यास तयार आहे. बेस्ट ही रक्कम कर्मचा-यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल. सदर सुधारणांची प्रक्रिया सुरु झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरु न झाल्यास सध्या दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत येत्या पालिकेच्या महासभेत मंजुरी दिली जाईल असेही महापौर महाडेश्वर यांनी सांगितले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या युनिअयन आणि कृती समितीने 18 ऑक्टोबर पासून उपोषण सुरु केले होते तसेच 21 ऑक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी संप करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता बोनस जाहीर केल्याने भाऊबीजेच्या दिवशी होणारा संप टळला आहे.

Post Bottom Ad