लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणा-याला ४८ तासात अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2017

लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणा-याला ४८ तासात अटक



मुंबई 23 Oct 2017 -
लोकल ट्रेनमध्ये तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणा-या तरुणाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी ४८ तासात अटक केली आहे. कृपा भादेबो पटेल (३०) असे या तरुणाचे नाव आहे. मूळचा ओरिसा येथे राहणारा कृपा सध्या मशीद बंदर येथील फुटपाथवर वास्तव्यास होता. हार्बर मार्गावरील सीएसएमटी - बेलापूर लोकलमध्ये शनिवारी हा प्रकार घडला होता. सकाळी ही घटना घडल्यामुळे दिवसादेखील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

सीएसएमटी स्थानकातून हार्बर फलाट क्रमांक १वरून बेलापूरला जाणारी लोकल निघाली.
लोकलच्या मधल्या महिला डब्यातून तरुणी प्रवास करत होती. मध्य महिला डब्यालगत असलेल्या दिव्यांग डब्यातील जाळीलगत उभा राहून कृपा पटेल या आरोपीने तरुणीकडे पाहून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या तरुणीने सीएसएमटी रेल्वे स्थानकात तक्रार दाखल करताच रेल्वे पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम सुरू केली. तरुणीने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी हार्बरसह मध्य आणि पश्चिम मार्गावर पथके रवाना केली. तसेच स्थानकातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्यात आली. सोमवारी सकाळी ६ वाजता आरोपी सीएसएमटी स्थानकातील धन्यवाद गेटजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक भद्रशेट्टे यांना मिळाली. यानुसार सापळा रचून रेल्वे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

तरुणीने तक्रार दाखल करताच विशेष पथकाने ४८ तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आणि सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्या देखरेखीखाली विशेष पथक नेमण्यात आले होते. यात वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे, निरीक्षक विलास चौगुले, उपनिरीक्षक भद्रशेट्टे आणि घोरपडे स.पो.नि. गावकर यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. हवालदार निकम आणि शिपाई सानप व पाटील यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. कृपा पटेल हा मूळचा ओरिसा येथील कंटाबाबजी तालुक्यातील असणारा कृपा बेरोजगार असल्याचे पोलीस चौकशीत दिसून आले. दिवसभर मोलमजुरी करून रात्री मशीद बंदर येथील गुलशन इराणी हॉटेलसमोरील फुटपाथवर वास्तव्यास होता.

Post Bottom Ad