मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविमा योजनेची मुदत संपल्याने सव्वा लाख कामगार मागील तीन महिन्यांपासून वंचीत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत विम्याची सुविधा देण्याबाबत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत विमा योजना सुरु न केल्यास उपायुक्त सुधीर नाईक यांना खूर्चीत बसू देणार नाही, असा इशारा मनसेने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिला आहे. मंगळवारी मनसेच्या शिष्टमंडळाने कामगारांची विमा योजना, कामगारांचे निवृत्तीवेतन आणि फेरिवाल्यांवर कारवाईसाठी परवाना खात्यातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेतली.
दोन वर्षापूर्वी विमा कंपनीकडून महापालिकेतील कर्मचाऱ्यांनाआरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत दोन मुले व पत्नी यांना पाच लाखापर्यंत फायदा घेता येतो. याकरिता पालिकेने एका खासगी कंपनीला काम दिले. सुमारे एक लाख 4 हजार कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळतो. परंतु, गेल्या जुलै 2017 ला या योजनेचा कालावधी संपला आहे. पुन्हा नुतनीकरण करण्यासाठी कंपनीने 135 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. मात्र पालिकेने सुमारे 116 कोटी रुपयेच कंपनीला देण्याचे मान्य केले. कंपनीने कामागारांना आरोग्य विमा देण्यास जुलै 2017 पासून बंद केले. वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे कुंटुंबासाठी असलेली आरोग्यविमा योजना बंद झाल्याने सुमारे सव्वा लाख कामगार विम्यापासून वंचीत आहेत. पालिकेने या कामागारांना तात्काळ आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस व माजी पालिका गटनेते संदीप देशपांडे यांनी आयुक्तांकडे केली.
कामगारांना निवृत्ती वेतनसंदर्भात मुख्यालयात एक खिडकी योजना सुरु करावी, फेरिवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची सुमारे 200 रिक्त पदे भरावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच आरोग्य विमा योजना नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत न मिळाल्यास पालिका उपायुक्त सुधीर नाईक यांना खूर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा पालिका आयुक्तांना दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तसेच कामगारांच्या निवृत्ती वेतनासंदर्भात पालिका मुख्यालयात एक खिडकी योजना सुरु करणार असल्याचे आयुक्तांनी मान्य केल्याचे देशपांडे म्हणाले.
मुंबईतील पदपथ व रस्ते बळकावले आहेत. फेरिवाल्यांवर वचक ठेवण्यासाठी पालिका परवाना खात्यातील 200 पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत, अशी मागणी देशपांडे यांनी आयुक्तांकडे केली. दरम्यान, जकात खाते बंद झाल्याने येथील सर्व कामागारांची परवाना विभागात बदली करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी मनसेच्या शिष्ठमंडळाला दिल्याचे देशपांडे म्हणाले.
मुंबईतील पदपथ व रस्ते बळकावले आहेत. फेरिवाल्यांवर वचक ठेवण्यासाठी पालिका परवाना खात्यातील 200 पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत, अशी मागणी देशपांडे यांनी आयुक्तांकडे केली. दरम्यान, जकात खाते बंद झाल्याने येथील सर्व कामागारांची परवाना विभागात बदली करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी मनसेच्या शिष्ठमंडळाला दिल्याचे देशपांडे म्हणाले.