मुंबईकरांच्या सेवेत 1 जानेवारीपासून एसी लोकल दाखल होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 October 2017

मुंबईकरांच्या सेवेत 1 जानेवारीपासून एसी लोकल दाखल होणार

मुंबई । प्रतिनिधी 26 Oct 2017 - 
मुंबईच्या प्रवाशांच्या सेवेत एसी लोकल येणार असे अनेक महिने सांगितले जात होते. एसी लोकल येणार याची चर्चा प्रवाशांकडून सुरु होती. मात्र हि लोकल नेमकी कधी येणार हे स्पष्ट होत नव्हते. मात्र आता खुद्द रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनीच 1 जानेवारीपासून एसी लोकल सुरु केली जाणार अशी घोषणा केली आहे. यामुळे नव्या वर्षापासून प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर सुरुवातीला एसी लोकलच्या दिवसातून सात फेऱया होणार आहेत. 

एसी लोकलची क्षमता ताशी किमान 110 किमी वेगाने धावण्याची असून प्रवासी क्षमता सुमारे 5964 च्या आसपास आहे. त्यात, आसनांची संख्या 1028 असून उभ्याने 4936 इतके जण प्रवास करू शकतात. या लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीने दरवाजे उघडबंद होणार आहेत. 12 डब्यांच्या या ट्रेनमध्ये 15 टनांचे दोन एसी युनिट प्रत्येक डब्याला जोडले आहेत. साधारण 18 महिन्यांपूर्वी चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये 54 कोटी रुपये किमतीची एसी लोकल दाखल झाली होती. ही लोकल दाखल होताच सॉफ्टवेअरमध्ये येत असलेल्या अडथळ्यांमुळे तिच्या चाचण्या रखडल्या होत्या. आता तिच्या बहुतांशी सर्व चाचण्या पूर्ण होत आल्या आहेत. आता शिल्लक ट्रायलही डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होतील. आरडीएसओ (रिसर्च डिझाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन) वेगासंदर्भातील चाचण्या घेईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या प्रमाणपत्रानंतर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर किंवा लोकलच्या फर्स्ट क्लासच्या दीडपट एसी लोकलचे तिकीट असणार आहे. मुंबईकरांसाठी आणखी नऊ एसी लोकल पाठविण्यात येणार आहेत.

Post Bottom Ad