बुलेट ट्रेनला मनसेपाठोपाठ काँग्रेसचाही विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2017

बुलेट ट्रेनला मनसेपाठोपाठ काँग्रेसचाही विरोध


मुंबई । जेपीएन न्यूज -
लोकलची स्थिती न सुधारता बुलेट ट्रेनचा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिला आहे.

मुंबईतील लोकलची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रवाश्यांच्या हिताच्या कोणत्याही सुविधा नाहीत. रोज गर्दीतून जीव मुठीत घेऊन प्रवाश्यांना प्रवास करावा लागतो. अशावेळी लोकलची परिस्थिती सुधारण्याची गरज असताना त्याकडे लक्ष न देता बुलेट ट्रेनचा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न होत आहे. बुलेट ट्रेनचा सर्वसामान्यांना उपयोगच काय? असा सवाल करून मुंबईकर प्रवाश्यांच्या हिताला प्राधान्य द्या, अन्यथा काँग्रेसला रस्त्यावर उतरून बुलेट ट्रेन विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा निरूपम यांनी दिला. एल्फिस्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे..

Post Bottom Ad