मुंबई । प्रतिनिधी -
‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रस्त्यांवर २४६ खड्डे पाडल्याप्रकरणी पालिकेने ४ लाख ८६ हजार रुपये दंड ठोठावला आहे. लालबागचा राजा सह एफ दक्षिण विभागातील १३ मंडळांना एकूण १२ लाख ९४ रुपयांचा दंड आकारला आहे. या सर्व मंडळांना पालिकेने नोटीस बजावण्यात आली आहे. मंडप उभारताना अनेक मंडळे परवानगीच घेत नाहीत, अशी माहिती महापालिकेने दिली.
विविध कारणांमुळे कायम चर्चेत असलेले ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ यावर्षीदेखील रस्त्यांमध्ये खड्डे पाडल्याप्रकरणी पुन्हा चर्चेत आले आहे. गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी अलोट गर्दी लोटत असल्यामुळे त्यांच्या सुविधेकरीता रस्त्यात मंडप उभारला जातो. लालबागच्या राजा या मंडळाने यावर्षी तब्बल २४६ खड्डे खोदले आहेत. यामुळे मंडळाकडून चार लाख ८६ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. गेल्यावर्षीही खड्डे पाडल्यामुळे पालिकेने लालबागच्या राजाला चार लाख ५० हजार रुपये या मंडळाला दंड आकारला होता.
लालबागचा राजा मंडळाप्रमाणेच लालबाग, परेल परिसरातील जिजामाता नगर सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ, गणेश मंडळ सीता नगर, गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग), सार्वजनिक गणेश मंडळ, परळ सार्वजनिक उत्सव मंडळ मिठाईवाला, गणेश गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ, अभ्युदय नगर सार्वजनीक गणेश मंडळ, राम टेकडी शिवडी, बाळ गोपाळ गणेश मंडळ काळाचौकी, लाल मैदान परळ, नरेपार्क परळ, बाळगोपाळ करीरोड, चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळ या मंडळांकडून दंडाची रक्कम आकारण्यासाठी पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
खड्डे पाडलेच नाहीत -
‘मंडळाने रस्त्यांत खड्डे खोदले नसून, पोलिसांनी आखून दिलेल्या नियमानुसार स्टीलच्या प्लेटवर लोखंडी खांब उभारले होते. यामुळे मंडळाने खड्डे खोदण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पालिकेचा खड्डे खोदल्याचा दावा चुकीचा आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर स्वच्छता मोहिमदेखील राबवली आहे. महापालिकेकडून अद्याप मंडळाला नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर मंडळ त्याची शहानिशा करुन काही दंड असल्यास भरेल. पालिका मंडळाला नेहमी सहकार्य करते, यावेळी सहकार्य करेल.
- बाळासाहेब कांबळे, अध्यक्ष लालबागचा राजा मंडळ
गणेशोत्सव मंडळांवर लावण्यात आलेला दंड
मंडळाचे नाव खड्डे दंड (रुपये)
लालबागचा राजा मंडळ २४३ ४ लाख ८६ हजार
गणेश गल्ली सार्व. गणेश मंडळ २०७ ४ लाख १४ हजार
जिजामाता नगर सार्व. गणेशोत्सव मंडळ १५ ३० हजार
गणेश मंडळ, सीता नगर १६ ३२ हजार
गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) १४ २८ हजार
परळ सार्व उत्सव मंडळ, मिठाईवाला २१ ४२ हजार
अभ्युदय नगर सा. गणेश मंडळ १२ २४ हजार
राम टेकडी शिवडी ०९ १८ हजार
बाळ गोपाळ गणेश मंडळ, काळाचौकी १२ २४ हजार
लाल मैदान, परळ १७ ३४ हजार
नरेपार्क, परळ २३ ४६ हजार
बाळगोपाळ, करीरोड २४ ४८ हजार
चिंचपोकळी, ३४ ६८ हजार
एकूण दंड १२ लाख ९४ हजार रुपये गणेश गल्ली सार्व. गणेश मंडळ २०७ ४ लाख १४ हजार
जिजामाता नगर सार्व. गणेशोत्सव मंडळ १५ ३० हजार
गणेश मंडळ, सीता नगर १६ ३२ हजार
गं. द. आंबेकर मार्ग (मध्य विभाग) १४ २८ हजार
परळ सार्व उत्सव मंडळ, मिठाईवाला २१ ४२ हजार
अभ्युदय नगर सा. गणेश मंडळ १२ २४ हजार
राम टेकडी शिवडी ०९ १८ हजार
बाळ गोपाळ गणेश मंडळ, काळाचौकी १२ २४ हजार
लाल मैदान, परळ १७ ३४ हजार
नरेपार्क, परळ २३ ४६ हजार
बाळगोपाळ, करीरोड २४ ४८ हजार
चिंचपोकळी, ३४ ६८ हजार