मुंबई । जेपीएन न्यूज -
एल्फिस्टन रॉड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कांजुरमार्गच्या रहिवासी सुभलता शेट्टी यांच्या मृतदेहावरुन सोन्याचे दागिने चोरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुभलता शेट्टी यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या नसल्याचे लक्षात आले आहे.
सोशल मीडियात फिरणाऱ्या एका छायाचित्रात एक जण सुभलता यांच्या हातातील बांगड्या काढून घेताना दिसल्याचे ट्विट सुभलता यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना ट्वीट केले आहे. या ट्विटची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने पश्चिम रेल्वे आरपीएफला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.