मुंबईत १९९६ पासून १९ इमारती कोसळून ३०७ जणांचा बळी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2017

मुंबईत १९९६ पासून १९ इमारती कोसळून ३०७ जणांचा बळी


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत गुरुवारी ३१ ऑगस्ट रोजी भेंडीबाजार येथील हुसैनी ही सहा मजली इमारत कोसळून एका लहान बाळासह एकूण ३३ निष्पाप लोकांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेत इमारतीमधील १४ रहिवाशी तसेच अग्निशमन दल, एनडीआरएफचे ७ जवान जखमी झाले आहेत. मुंबईत हुसैनी या इमारतीच्या दुर्घटने प्रमाणेच १९९६ पासून अद्याप १९ इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. या दुघटनांमध्ये अद्याप ३०७ जणांचा बळी गेला आहे. २०१३ मध्ये ४ इमारतीच्या दुर्घटना घडून ७८ बळी गेले होते. तर १९९७ मध्ये ३ इमारतीच्या दुर्घटना घडून ३९ बळी गेले होते. सन २००५ ते २०१७ या कालावधीत १४ विविध ईमारत दुर्घटनामध्ये तब्बल २०४ जणांचा नाहक बळी गेला आहे.

१९९६ ते १९९८ या तीन अवघ्या ३ वर्षात ५ इमारत दुर्घटनामध्ये तब्बल १०३ लोकांचा नाहक बळी गेला आहे. ७ मार्च १९९६ रोजी एफ/ उत्तर विभागात नवरे अपार्टमेंट इमारत दुर्घटना घडून २९ जणांचा बळी गेला. १७ एप्रिल १९९७ रोजी मालड येथील सुखसागर इमारत दुर्घटना घडून १८ जणांचा बळी गेला. त्यानंतर १६ ऑगस्ट १९९७ रोजी विलेपार्ले येथे प्रवीण श्रुती इमारत दुर्घटना घडून २ जणांचा बळी गेला. त्यानंतर १६ सप्टेंबर १९९७ रोजी वरळी येथे पुनम चेंबर्स इमारत दुर्घटना घडून १९ जणांचा बळी गेला. तसेच ३ ऑगस्ट १९९८ रोजी एच / पुर्व येथे गोविंद टॉवर इमारत दुर्घटना घडून ३५ जणांचा बळी गेला.

सन २००५ ते २०१७ या कालावधीत १४ विविध ईमारत दुर्घटनामध्ये तब्बल २०४ जणांचा नाहक बळी गेला आहे. यात २५ जून २००५ रोजी खार येथील पुष्पांजली इमारत दुर्घटना घडून ६ जणांचा, १८ जुलै २००७ रोजी बोरीवली येथील लक्ष्मीछाया ही इमारत दुर्घटना घडून २९ जणांचा, १३ जुलै २००८ रोजी सी विभागातील दत्त निवास ही इमारत दुर्घटना घडून २१ जणांचा, २५ ऑगस्ट २००९ रोजी ग्रांटरोड यूसूफ़ मन्झिल ईमारत दुर्घटना घडून १ जणाचा तर २८ जुलै २०१० रोजी कुर्ला येथील रफिक इस्टेट ही इमारत दुर्घटना घडून १ जणाचा तसेच १० जून २०१३ रोजी माहिम येथील अल्ताफ मेन्शन ही इमारत दुर्घटना घडून १० जणांचा बळी गेला आहे.

२२ जून २०१३ रोजी दहिसर येथील पीयूश ही इमारत दुर्घटना घडून ७ जणांचा, २७ सप्टेंबर २०१३ रोजी माझगाव येथील बाबू गेनू ही इमारत दुर्घटना घडून ६१ जणांचा बळी गेला आहे. ६ ऑक्टोबर २०१३ रोजी मालाड येथें गोखलेवाडी ही ईमारत अचानक कोसळली मात्र सुदैवाने यात कोणीही मृत्यूमुखी पडले नाही. १४ मार्च २०१४ रोजी सांताक्रूझ येथील शंकरलोक ही धोकादायक रिकामी इमारत शेजारील चाळीवर कोसळली होती त्यात ७ जणांचा बळी गेला होता. त्याचप्रमाणे ९ मे २०१५ रोजी काळबादेवी येथील गोकुळनिवास इमारत आग लागून कोसळली आणि या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या ४ अधिकार्यांचा मृत्यू झाला.

२५ जुलै २०१७ रोजी घाटकोपर येथील सिद्धि साई ही इमारत कोसळली आणि त्यात १७ जणांचा बळी गेला आणि १३ जण जखमी झाले. त्यानंतर पवई चांदीवली येथें धोकादायक कृष्णन बिझनेस पार्क या धोकादायक इमारतीचे पाडकामं सुरू असताना इमारतीचे बांधकाम कोसळले आणि ७ जणांचा बळी गेला. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जे. जे. रुग्णालय जवळील मौलाना शौकत अली रोडजवळील हुसैनवाला ही इमारत कोसळली आणि ३३ जणांचा बळी गेला तर २१ जण जखमी झाले. हुसैनी हि इमारत कोसळण्यापूर्वीच कारण २६ ऑगस्ट रोजीच पवई, चांदीवली येथे कृष्णन बिझनेस पार्क या धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू असतानाच इमारतीचा काही भाग कोसळून ७ जण ठार झाले. तत्पूर्वी २५ जुलैला घाटकोपर येथील साई सिद्धि ही ईमारत कोसळून १७ जणांचा बळी गेला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत.

Post Bottom Ad