संकटसमयी धावून येणाऱ्या बेस्टला पालिका आयुक्तांनी आर्थिक मदत करावी - अनिल कोकीळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 September 2017

संकटसमयी धावून येणाऱ्या बेस्टला पालिका आयुक्तांनी आर्थिक मदत करावी - अनिल कोकीळ


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत २९ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात रेल्वेसह इतर सर्व खाजगी वाहतूक सेवा बंद झाल्या होत्या. अश्या परिस्थितीत बेस्ट परिवहन सेवेने धावून येत मुंबईकरांना सुखरूपपणे घरी पोहचविण्याची जबाबदारी पार पडली. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही याची दखल घेत बेस्टच्या कामगिरीचे कौतुक केले. या निमित्ताने पुन्हा एकदा शंभर वर्षाहून अधिक वर्ष सेवा देणाऱ्या बेस्ट परिवहन सेवेचे महत्व यामुळे अधोरेखित झाले आहे. अडीअडचणीच्या काळात बेस्ट सारख्या सार्वजनिक सेवेचे मोल लक्षात घेऊन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सहानभूतीचा दृष्टीकोन ठेऊन बेस्टला आर्थिक बिकट परिस्तिथीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी पत्राद्वारे केली आहे.

मुंबईत पावसाने घातलेल्या हाहाकाराने अनेक मुंबईकर रस्तोरस्ती अडकून पडले होते रेल्वे हि बंद झाल्यामुळे अनेकांना ट्रेनमध्येच अडकून पडावे लागले होते . तर रस्त्यावर अडकून पडणाऱ्यांना कोणतेही खाजगी वाहतूक सेवा उपलबध नव्हती , अशा वेळी बेस्ट ने मुंबईकरांसाठी धावून येत भर पावसात बेस्ट बस च्या माध्यमातून जनतेला मोठी सेवा उपलबध करून दिली . या दिवशी बेस्टने सुमारे ३० लाख इतक्या प्रवाशांना मदतीचा हात दिला तसेच दुसऱ्या दिवशी अडकलेल्या लोकांसाठी मुंबई च्या छत्रपती शिवाशी टर्मिनस येथून ठाणे व नवी मुंबईसाठी जादा बसगाड्या उपलबध करून देत जनतेला दिलासा दिला . बेस्ट च्या या कामगिरीचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही तोंडभरून कौतुक केले . एकीकडे सर्व खाजगी सेवा पूर्णपणे ठप्प झाले असता बेस्ट ने साचलेली पाण्याची पर्वा न करता अड्कलेल्या जनतेस सुखरूपपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारी पार पडली . या सर्व गोष्टींचा विचार करता सार्वजनिक परिवहन सेवेचे महत्व अधिकच अधोरेखित झाले आहे . जनतेसाठी बेस्ट चे महत्व लक्षात घेऊन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टला जगविण्यासाठी सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेऊन बिकट आर्थिक परिस्तिथीतून बाहेर येण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती कोकीळ यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे .

Post Bottom Ad