बस आगारातच कचरा वर्गीकरण व खत निर्मिती करा - सुनिल गणाचार्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2017

बस आगारातच कचरा वर्गीकरण व खत निर्मिती करा - सुनिल गणाचार्य


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याचे परिपत्रक महापालिकेने काढले आहे. या परिपत्रकानुसार बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा, दादर व वडाळा आगारात जमा होणाऱ्या ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण बस आगारांमध्येच करावे, जमा होणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करावी अशी ठरावाची सूचना बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली आहे. 

मुंबईत रोज अंदाजे ८८६६ टन कचरा जमा होतो. या कचऱ्याची महापालिकेद्वारे देवनार, कांजूरमार्ग, व मुलुंड डम्पिंग ग्राउंडमध्ये विल्हेवाट लावण्यात येते. मात्र आता डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे आता स्थानिक पातळीवर व कचऱ्याचे वर्गीकरण करून जनजागृती करण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा, दादर व वडाळा येथील कार्यालये, उपहार गृहे आणि आगारांमध्ये जमा होणारा कचरा जास्त प्रमाणात आहे. यामुळे या ठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करावे आणि त्यापासून खत निर्मिती करावी अशी मागणी सुनिल गणाचार्य यांनी केली आहे.

Post Bottom Ad