गेल्या वर्षभरात ५६१ रस्त्यांची कामे पूर्ण -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईतील विकास कामे पावसाळयात बंद ठेवण्यात येतात. हि विकासकामे पावसाळ्यानंतर पुन्हा सुरु करण्यात येतात. महापालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या रस्ते कामांपैकी जून २०१७ पर्यंत ५६१ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झालेली आहेत. पावसाळ्यानंतर म्हणजेच येत्या ऑक्टोबर पासून ४५९.४८ किमी लांबीच्या रस्त्यांवरील १ हजार ६६८ कामे आणि जंक्शनची ११२ कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त ६६४ रस्त्यांची कामे आणि ५९ जंक्शनची कामे प्रस्तावित करण्यात आली असून याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. कामाच्या आवश्यकतेनुसार ४ वर्गवारींमध्ये विभागण्यात आली आहेत, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी दिली आहे.
जे रस्ते पूर्णपणे नव्याने करण्यात येणार आहेत, अशा रस्त्यांचा समावेश 'प्रकल्प रस्ते' या वर्गवारीत करण्यात आला आहे.यामध्ये १४४९ कामांचा समावेश आहे. तसेच १५८ जंक्शनचा देखील प्रकल्प कामांमध्ये समावेश आहे. यापैकी ३४४ रस्ते कामांची व ४० जंक्शनच्या कामांची पूर्तता पावसाळ्यापूर्वीच करण्यात आली आहे. तर ८३५ कामे व जंक्शनची ११२ कामे ऑक्टोबर पासून टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. उर्वरित ८८.४९ किमी लांबी असणा-या रस्त्यांच्या २७० 'प्रकल्प' कामांसाठी निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये जंक्शनच्या ६ कामांचा देखील समावेश आहे. रस्त्यांचा पृष्ठभाग फार खराब झाल्याचे किंवा मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे आढळून आले आहे, अशा रस्त्यांच्या भागांचा समावेश 'प्राधान्यक्रम १' अंतर्गत करण्यात आला आहे. यामध्ये साधारणपणे ११२ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. रस्त्यांच्या ज्या भागांवर काही प्रमाणात खड्डे पडल्याचे आढळून आले आहे व पृष्ठभाग सुद्धा ब-याच अंशी खराब झालेला आहे, अशा कामांचा समावेश 'प्राधान्यक्रम २' अंतर्गत करण्यात आला आहे. यामध्ये ९३८ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. यापैकी ११० रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहेत. तर उर्वरित ८२८ रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबर पासून टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत.
रस्त्यांच्या ज्या भागांवर तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्याची आवश्यकता नव्हती, पंरतु नजिकच्या काळात दुरुस्ती करणे आवश्यक होते, अशा कामांचा समावेश 'प्राधान्यक्रम ३' अंतर्गत करण्यात आला आहे. यामध्ये ९३.८९ किमी लांबी असणा-या रस्त्यांच्या ३९४ कामांचा समावेश आहे. तसेच याअंतर्गत जंक्शनची ५३ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांचीही निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यांच्या ज्या भागांवर तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्याची आवश्यकता नव्हती, पंरतु नजिकच्या काळात दुरुस्ती करणे आवश्यक होते, अशा कामांचा समावेश 'प्राधान्यक्रम ३' अंतर्गत करण्यात आला आहे. यामध्ये ३९४ रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. तसेच याअंतर्गत जंक्शनची ५३ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांचीही निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. सर्व ४ गटातील कामे ही 'दोषदायित्व कालावधी' (Defect Liability Period) अंतर्गत असणार आहेत. प्रकल्प रस्त्यांसाठी दोष दायित्व कालावधी हा तीन वर्षांचा आहे. तर प्राधान्यक्रम १, २ व ३ अंतर्गत असणा-या पुनर्पृष्ठीकरणाच्या कामांचा दोषदायित्व कालावधी हा दोन वर्षांचा आहे. या कालावधीदरम्यान कामे झालेल्या भागात खड्डे उद्भवल्यास ते भरुन संबंधित रस्ता मोफत स्वरुपात सुस्थितीत करुन देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे, अशीही माहिती चिठोरे यांनी दिली आहे.