प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या मार्गांना सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2017

प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या मार्गांना सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य


मुंबई । जेपीएन न्यूज -
एल्फिन्स्टन स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी आज सुरक्षेच्या मुद्द्यावर उच्च स्तरीय बैठक बोलावत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. प्लॅटफॉर्म, फूट ओव्हर ब्रिज आणि प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या मार्गांना सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. तसंच ते बांधण्यासाठी अर्थसंकल्पाचे कुठलेही निर्बंध नसतील, असं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

या बैठकीत रेल्वेवरील पादचारी पुलांना 'अत्यावश्यक सुविधे'चा दर्जा देण्यात आल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. रेल्वेवरील पादचारी पुलाला १५० वर्षांपासून 'प्रवासी सुविधा' असा दर्जा होता. त्यात बदल करुन आता 'अत्यावश्यक सुविधे'चा दर्जा देण्यात आला आहे. प्रशासकीय किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे रेल्वेसंबंधीच्या विविध सुरक्षा विषयक कामांना उशीर होऊ नये म्हणून, रेल्वेतील महाव्यवस्थापकांना सुरक्षेबाबत उपाय योजना राबवण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

बैठकीत घेतलेले निर्णय - > पश्चिम आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना सुरक्षेसंदर्भात विशेष अधिकार देणार, पुढील १८ महिन्यांसाठी राहणार अधिकार
> मुंबईतील गर्दीच्या स्थानकांवर अतिरिक्त सरकते जिने बसवणार.
> मुख्यालयातील २०० वरिष्ठ अधिकाऱ्यांना फिल्ड ड्युटी देणार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती
> सुरक्षेसाठी देशातील ४० यार्ड आधुनिक करणार. त्यातील ८ रेल्वे यार्ड मुंबई परिसरातील. १ हजार कोटींची गुंतवणूक
> सर्व लोकलमध्ये १५ महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

Post Bottom Ad