मुंबईची पाणीसमस्या काही वर्षात मिटणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 September 2017

मुंबईची पाणीसमस्या काही वर्षात मिटणार


मुंबई | अजेयकुमार जाधव -
मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना मागणीपेक्षा कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो. हवा तितका पाणीपुरवठा होत नसल्याने नागरीकांचे हाल होत असतात. पाणयामुळे होणारे नागरिकांचे हाल बंद करण्यासाठी मुंबईकरांना 2041 पर्यंत पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध करण्यासाठी पालिकेने तयारी सुरु केली आहे. पाणीसाठा दुप्पट करण्यासाठी पालिका नवी तीन धरणे बांधणार आहे. या धारणांना बहुतेक परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती जल अभियंता अशोक तवाडिया यांनी दिली.

मुंबईकरांंना दररोज 4500 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असते. त्यापैकी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, तुलसी, भातसा, विहार या सात धरणातून महापालिका 3900 दशलक्ष लिटर इतके पाणी रोज उचलते. यापैकी 150 दशलक्ष लिटर इतके पाणी ठाणे, भिवंडी आणि निजामपूरला दिले जाते. उरलेले 3750 दशलक्ष लिटर पाणी रोज मुंबईला पाठवले जाते. मुंबईला हवे तितके पाणी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी कमी पाणी येणे, उंच भागावरील लोकांना पाणी न मिळणे इत्यादी समस्या भेडसावत असतात. कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत पालिकेने मुंबईकरांची पाणी समस्या मिटवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

नागरिकांची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सात धरणा व्यतिरिक्त गारगाई, दमणगंगा आणि पिंजाळ हि तीन धरणे बांधण्याची तयारी सुरु केली आहे. गारगाई धरणातून 440 दशलक्ष लिटर, दमणगंगा धरणातून 1865 दशलक्ष लिटर, पिंजाळ धरणातून 1865 दशलक्ष लिटर असे एकूण 3170 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचे तवाडिया म्हणाले. या तिनही प्रकल्पाना केंद्र सरकारच्या व सबंधित विभागांच्या 90 टक्के परवानग्या मिळाल्या आहेत. गारगाई प्रकल्पाचा सर्व्हे सुरु असून हा प्रकल्प येत्या 4 वर्षात तर दमणगंगा व पिंजाळ हे प्रकल्प प्रत्तेकी सात वर्षात पूर्ण होतील अशी अपेक्षा तवाड़ीया यांनी व्यक्त केली आहे.

Post Bottom Ad