हुसैनी इमारतीतील मृतांचा आकडा ३३ वर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2017

हुसैनी इमारतीतील मृतांचा आकडा ३३ वर


मुंबई । जेपीएन न्यूज -
मुंबईतील भेंडीबाजार मधील हुसैनी सहा मजली इमारत गुरुवारी सकाळी ८. ३० वाजता कोसळली. तेव्हापासून रात्रभर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाकडून (एनडीआरएफ) व अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून अद्याप ४७ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २४ पुरुष व ९ महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत २१ जण जखमी असून त्यांच्यावर जे जे व सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हुसैनी इमारतीमधील दुर्घटनेत जखमी झालेल्या २१ जणांपैकी ६ जण अग्निशमन दलाचे कर्मचारी व एक एनडीआरएफचा जवान आहे. अग्निशमन दलाचे प्रशांत गजवारे ३२, तातोबा दत्तू पाटील ५२, सुदाम संभाजी मोरे २१, विक्रम दत्तू कांबळे २१, किरण विलास सकट २१, उदय जगन्नाथ सुर्वे लिडिंग फायरमन ४०, तसेच एनडीआरएफचे उप लष्करी अधिकारी महेश नलावडे या सर्वांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर २१ जखमी रहिवाश्यांपैकी जुजन हसन आरसीवाला या एका जखमीवर सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पालिकेच्या स्थायी समितीत दुर्घटनेत मृत्यू पावलेल्याना श्रद्धांजली देत बैठक तहकूब करण्यात आली आहे.

भेंडीबाजार परिसरातील हुसैनी ही इमारत ११७ वर्षे जुनी होती. हुसैनी या इमारतींसह भेंडीबाजार परिसरातील २५० इमारतींचा सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट या ट्रस्टकडून पुनर्विकास सुरु झाला होता. मे २०१७ मध्ये हुसैनी इमारत पाडण्याची परवानगीही मिळाली होती. समूह विकासा माध्यमातून या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार होता त्याआधीच इमारतीतील रहिवाशांना मंगळवारी मृत्यूने गाठले. या इमारत दुर्घटनेची अप्पर मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची आर्थिक मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मृतांची नावे - 
हसन आरसीवाला ४५
तसलीम आरसीवाला ४५
फातिमा सय्यद जाफर १४
नसिर अहमद २४
सय्यद जमाल जाफर १९
बच्चूआ २२
नसीर गुलाम शेख २५
सकीना चष्मावाला ५०
कयुम २५
रईस ५८
रिझवान २५
मुस्तफा शाह २२
नासिरुद्दीन अब्बास चष्मावाला ७१
हफीज मोहसीन शेख ३८
अल्ताफ हैदर मन्सुरी १२
अब्बास निजामुद्दीन चष्मावाला ४०
मोहम्मद इम्रान फारुख खान ३५
अलीम शाह ३२
अहमदतुल्ला अब्बास चष्मावाला ३
अफजल आलम २०
रेश्मा सैयद ३८
सय्यद जाफर हुसैन ५०
इब्राहिम कुरेशी लाईटवला २२
रशिदा कुरेशी लाईटवला ६०
मुरतुझा कुरेशी लाईटवला ३२
अल्फीया मंडसोरवाला २५
बुऱ्हानुद्दीन मुफझल मंडसोरवाला २० दिवस
बुऱ्हानुद्दीन मुरतुजा लाईटवाला ६
सकीना मुरतुजा लाईटवाला २८
अहमतुल्ला मुरतुजा लाईटवाला ३
मोहम्मद इकबाल मुस्तकीन खान ३५
अब्दुल रहेमान अब्दुला खान १९
एका मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.

या संदर्भातील आणखी बातमी

Post Bottom Ad