मुंबईत पडझडीच्या घटनांत ६ जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2017

मुंबईत पडझडीच्या घटनांत ६ जण जखमी


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत पावसाळयात इमारत व भिंती पडण्याच्या घटना घडतात. मात्र आता पाऊस नसतानाही पडझडीच्या घटना सुरुच आहेत. कुर्ला येथे एका इमारतीच्या खोलीच्या प्लास्टरचा भाग पडल्याने ४ जण जखमी झाले तर सांताक्रूझ येथील जुहूतारा रोडवर झाड कोसळल्याने २ जण जायबंदी झाले.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात झाडे तसेच झाडांच्या फाद्यां कोसळण्याच्या घटना घडतात.तसेच घरे भिंतीचा भागही पडण्याचा घटना घडतात.मुंबईत सध्या पाऊस नाही मात्र पडझडीच्या घटना सुरूच आहेत विशेषतः झाडे उन्मळून पडणे झाडांच्या फाद्यां कोसळणे सातत्याने सुरूच आहे . त्याचप्रमाणे शॉर्टसर्किटच्या तक्रारीही सतत येत आहेत . काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुर्ला पश्चिम हलावपुल ,माकडवाला कम्पाउंड येथील साई शंकर चाळ या तळ मजला अधिक एक मजला असे बांधकाम असलेल्या इमारतीच्या खोली क्रमांक ३च्या अँगल व प्लास्टरचा भाग पडला या घटनेत ४ जण जखमी झाले .त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले .नसरीन खान(३२) , रुकसाना खान (२९) ,दानिश खान (१५) व शहाबाद खान (३) अशी या घटनेतील जखमींची नावे आहेत. गेल्या २४ तासात शहर व उपनगरात एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या तर९ ठिकाणी झाडे , झाडांच्या फाद्यां पडण्याचा तक्रारी प्राप्त झाल्या .सांताक्रूझ पश्चिम, जुहूतारा रोड येथील मानीकजी कूपर शाळेसमोर काल सायंकाळी झाड कोसळल्याने २ जणांना दुखापत झाली .आनंद कनोजिया (३६) व जितेश परदेशी (३१) अशी जखमींची नावे आहेत त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार करण्यात आले .दरम्यान ,शनिवारी चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत झाड पडल्याने ३ महिला जखमी झाल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा अशीच घटना घडल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post Bottom Ad