मुंबई । जेपीएन न्यूज -
एल्फिन्स्टन स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा २२ वरुन २३ वर पोहचला आहे. सत्येंद्र कनोजिया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सत्येंद्र कनौजिया यांच्यावर केईएम रूग्णालयात उपचार सुरु होते आणि त्यांचे वय ४० वर्षे होते.पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन आणि मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाल्याने ३९ जण जखमी झाले असून २२ जण ठार झाले होते. पावसामुळे पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठा आवाज झाल्याने पूल कोसळत असल्याची तसेच पुलाला शॉक लागत असल्याची अफवा पसरल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन हि दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जखमी प्रवाश्याना उपचारासाठी जवळच्या पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २३ मृतांमध्ये १५ पुरुष असून ८ महिला प्रवासी आहेत. तर जखमी झलेल्या ३९ जणांपैकी ३० पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे.