कल्याण । प्रतिनिधी -
जगभरात हृदय रोग झपाट्याने वाढत चालला असून भारतात गतवर्षी पेक्षा यंदा हृदय रोगाच्या केसेसमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली असून हृदयरोगाची समस्या असलेल्या सर्वात तरुण रुग्णांमध्ये २२ वर्षांवरील पुरुषांना आणि ३८ वर्षाच्या स्त्रीयांना या रोगाचा त्रास जाणवू लागला असल्याची बाब चिंताजनक आहे असल्याची माहिती इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. झाकिया खान यांनी पत्रकारांना दिली. कल्याण येथील फोर्टिसच्या कॅथलॅबला चार वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खान बोलत होत्या.
हृदयरोगाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर फोर्टीज रुग्णालयाच्या वतीने या आजाराबाबत पत्रकाराना दिलेल्या माहिती नुसार २६३३ रूग्णांपैकी कोरोनरी आर्टरी ग्राफ्ट (सीएजी) चे प्रमाण पुरुषांमध्ये ७० टक्के होते. एकूण ७०७ पर्पेट्युन्स टान्स्लुमिनियल कोरोनरी अँजिओप्लॅस्टीपैकी (पीटीसीए) ८७ टक्के पुरुष आणि १३ टक्के महिला होत्या. तर ६५ वर्षाच्या पुरुष रूग्णासाठीचा ‘नीडल टु बलून टाइम’ केवळ १५ मिनिटे होता. रुग्णालयातील डॉ. झाकिया खान यांनी हि माहिती दिली. रुग्णांना योग्य वेळेस प्रभावी आणि योग्य पद्धतीने उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. गेल्या काही वर्षांत भारतातील हृदयरोग केसेसमध्ये दहा टक्के वाढ झाली असून हि गंभीर बाब असल्याचे त्या म्हणाल्या. किडनी निकामी झालेल्या व डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनाही तीव्र हृदयरोगाचा सामना करावा लागत असून या रुग्णांवर देखील फोर्टीज रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आल्याचे डॉ खान यांनी सांगितले. भारतातील हृदयरोग केसेसमध्ये दहा टक्के वाढ झाली असून हि गंभीर बाब असल्याची माहिती त्यांनी दिली.