विरार सीएसटी लोकल चालवण्यास नकार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 August 2017

विरार सीएसटी लोकल चालवण्यास नकार


मुंबई / प्रतिनिधी -
पश्चिम रेल्वेवरील प्रवाश्याना सकाळी गर्दीच्या वेळी सीएसटीकडे व सायंकाळी सीएसटीकडून बोरिवली, विरार, डहाणूकडे प्रवास करताना दादरला लोकल बदलून प्रवास करावा लागतो. अनेक वेळा प्रवाश्यांना गर्दीमुळे प्रवाशांना डब्यात चढणेही अवघड होते. प्रवाश्यांना दगदग कमी व्हावी यासाठी विरारहून थेट सीएसटीपर्यंत लोकल सुरु करण्याची मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. परंतू पश्चिम रेल्वेने विरार सीएसटी लोकल सेवा सुरु करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाश्यांच्या सोयीसाठी सीएसटी तेअंधेरी लोकल सेवा मध्य रेल्वेकडून सुरु आहे. ही सेवा विरारपर्यंत वाढवावी अशी चोरघे यांची मागणी होती. मध्य रेल्वे ज्याप्रमाणे हार्बर मार्गावर सीएसटी ते अंधेरी लोकल चालवते. त्याच धर्तीवर पश्चिम रेल्वेने विरार ते सीएसटी लोकल सेवा सुरु केल्यास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना फायदा होईल, असे त्यांचे म्हणणे होते. हार्बर लाईनवर सर्व गाड्या मध्य रेल्वेकडून चालवल्या जातात. त्यामुळे हार्बर मार्गावर गाड्या चालवू शकत नाही, असे पश्चिम रेल्वे कळवले आहे. यामुळे विरारहून थेट सीएसटीपर्यंत पोहोचण्यासाठी चाकरमान्यांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

Post Bottom Ad