मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शना खाली आमदार, विभाग प्रमुख, माजी महापौर मुंबई सुनील प्रभु यांनी दिंडोशी विधासभेतील सर्व शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत विधानसभा मतदारसंघातील प्रभागात विविध सामाजिक कार्यक्रम सप्ताह आयोजित केला होता.
यात भागा भागात जागेच्या उपलब्धतते नुसार वृक्षारोपण, प्रत्येक प्रभागात महा आरोग्य शिबीरे, दहावी - बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप, रक्तदान शिबिर, शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ओळखपत्रांचे वितरण, १ ली ते १० पर्यंतच्या विद्यार्थानां वह्या वाटप, नागरिकांसाठी छत्री वाटप, तसेच दिनांक २५ जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते स्व. अविनाश साळकर स्मृती, श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय संचालित वास्तूचे लोकार्पण इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते या सामाजिक सप्ताहाची सांगता आज दिंडोशी कुरार गाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाच्या सुशोभित भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर व आमदार, विभाग प्रमुख सुनिल प्रभु यांच्या हस्ते झाले. या प्रवेशद्वाराचे शुशोभीकरण जिल्हा नियोजन विकास निधीमधून आमदार सुनिल प्रभु यांनी करून घेतले.
यावेळी विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, नगरसेवक आत्माराम चाचे माजी नगरसेवक प्रशांत कदम, सुनिल गुजर, गणपत वारिसे, उपविभाग प्रमुख विष्णू सावंत, विधानसभा संघटक अनघा साळकर, उपविभाग संघटक रीना सुर्वे, पूजा चौहान, महिला व पुरुष शाखाप्रमुख उपस्थित होते.