मुंबई - संदीप विद्यापीठाने इंडियन फॅशन अकॅडमी (आयएफए) या संस्थेच्या सहकार्य़ाने देशाच्या इतिहासातील बदल स्वातंत्र्य दिनी अधोरेखित करत “संदीप देसिन्झ २०१७” आयोजित फँशन शोव्दारे विद्यार्थ्यानी बनविलेल्या डिझाईन्सव्दारे सादर करून एक अनोखी मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे. हा कार्यक्रम घाटकोपर येथील श्रीमती भुरीबेन गोलवाला सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांची डिझाईन सादर केली. या कार्यक्रमासाठी सलीम असगरअली हे डिझायनर उपस्थित होते.
मानवी संस्कृतीच्या उदयापासून भारतीय वास्तुरचना अस्तित्वात आहे. सिंधु संस्कृतीपासून ते मंदिरे आणि चैत्य,विहार, स्तूप यासारख्या धर्मिक वास्तुरचना आणि आधुनिक वास्तुरचनेपर्यंत भारतीय वास्तुरचनेचे विविध टप्पे पाहायला मिळतात. प्राचीन इतिहासाच्या या प्रवासात विविध कालखंड दर्शविणारे रंग, पोत, रचना आणि कापडाचे प्रकार सादर करण्यात आले.
आम्हाला पहिल्या वर्षीच भरघोस प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलांमध्ये झालेल्या चर्चेतूनच भारतीय वास्तुरचना ही संकल्पना पुढे आली व त्याव्दारे आपण बदलत्या भारतीय वास्तूरचना डिझाईन्सव्दारे सादर करून देशाचा इतिहास आणि आधुनिकता हे डिझाइन्सच्या माध्यमातून सादर करून स्वातंत्र्यदिनी ही आमच्याव्दारे मानवंदनाच असल्याचे मत आयएफएचे संस्थापक नितीन मगर यांनी व्यक्त केले.
आम्ही तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात मापदंड तयार केला आहे आणि इतर क्षेत्रातही आम्हाला आमचे पंख पसरायचे आहेत. यासाठीचे पहिले पाऊल म्हणून स्कूल ऑफ फॅशन डिझाईन आणि ब्युटी कॉस्मेटॉलॉजी स्थापन करण्यासाठी आम्ही आयएफएशी हातमिळवणी केली आहे. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे हा फॅशन शो आयोजित करून पहिल्या वर्षातच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”, असे संदीप विद्यापीठ आणि संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा म्हणाले.