लोकलमधील प्रवाश्याना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2017

लोकलमधील प्रवाश्याना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले


रेल्वेचे मात्र प्रवाश्यांकडे दुर्लक्ष
मुंबई । प्रतिनिधी
मुंबईत मंगळवारी आसनगाव आणि दुरांतो एक्प्रेसचा झालेला अपघात त्यानंतर झालेला मुसळधार पाऊस यामुळे मंगळवारी दिवसभर हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा पूर्ण दिवस बंद होती. त्यानंतर बुधवारीही पाणी ओसरल्यानंतर तांत्रिक बिघाडाचे कारण देत संपूर्ण दिवस रेल्वे सेवा बंद असल्याने मुंबईतील प्रवाश्यांचे हाल झाले. मंगळवारी मुंबई महापालिकेचा आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दल प्रवाश्यांचा जीव वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवत असताना. रेल्वेमध्ये प्रवासी अडकले होते त्या रेल्वेने मात्र प्रवाश्याना आहे त्याच परिस्थितीत टाकल्याचे दिसत होते. यामुळे प्रवाश्यांकडून रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर टिका होत आहे.

मुंबईत मंगळवारी सकाळपासून पावसाने हाहाकार माजवाल्याने मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले. यामुळे ट्रॅकवर पाणी साचल्याने अनेक प्रवाश्यांना चालत जवळचे स्टेशन गाठावे लागले तर अनेकांना रात्र रेल्वे स्टेशन, मंदिर आणि ऑफिसमध्येच काढावी लागली. सीएसटी, चर्चगेट, दादर, घाटकोपर, कुर्ला यासारख्या स्थानकावर लोकांनी रात्र काढावी लागली. रेल्वे ट्रॅकवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेकी प्रवासी लोकलमध्येच थांबले होते.

चालत जाणारे प्रवासी इतर ठिकाणी जाऊन सुखरूप पोहचले तरी लोकलमधील प्रवाश्यांचा जीव टांगणीला लागला होता. अश्या परिस्थिती मुंबई महापालिकेचा आपत्कालीन विभाग, मुंबई अग्निशमन दल, पोलीस विभाग यांच्याशी संपर्क साधून बचाव कार्य राबवण्यास सांगण्यात येत होते. प्रवाश्यांच्या या मागणीला पालिका आणि अग्निशमन दलाने प्रतिसाद देत लोकलमध्ये अडकलेल्या ४२५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तर घरी पोहोचू न शकलेल्या जनतेसाठी पालिकेने ७० शाळांमधून राहण्याची व्यवस्था केली. मात्र इतक्या मोठ्या संख्येने प्रवाश्याना बाहेर काढले जात असताना रेल्वेचे अधिकारी आणि रेल्वे प्रशासन मात्र होते.

सायन स्थानकाजवळ लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाश्याना पालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांच्या सूचनेनुसार नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिवसैनिकांनी तराफा टाकून बाहेर काढले. तर सहाय्यक आयुक्त केशव उबाळे, एल विभागाचे सहाय्यक अभियंता गवळी, मुख्य अग्निशमन अधिकारी रहांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी सांगळे यांच्या टीमने व स्थानिक चौ खांब मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन लोकलमध्ये अडकलेल्या १२ ते १५ अपंग, ३५ महिला, व ४ पत्रकारांना व इतर प्रवाश्याना रेस्क्यू ऑपरेशन राबवून बाहेर काढले आहे. या सर्व प्रवास्यांच्या जेवणाची खाण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगरसेवक मंगेश सातमकर व शिवसैनिकांनी केली.

Post Bottom Ad