मुंबई - मुंबईतल्या गोरेगांव एक्झिबिशन सेंटर येथे नुकताच रेस्तराँ अॅण्ड केटरिंग शो आयोजित करण्यात आला होता. यात उदयोन्मुख शेफ्स आणि मिक्सॉलॉजिस्ट्सच्या प्रतिभेला आलेले उधाण आले होते. 'हॉस्पिटॅलिटी फर्स्ट' या सोहळ्याला जोडूनच 'गोर्मे चॅलेंज' नावाची स्पर्धाही यूएस प्रिमियम अॅग्रिकल्चरल प्रोडक्ट्सच्या सहयोगाने घेण्यात आली होती. भारतातील सर्वांत मोठ्या पाककला स्पर्धांपैकी एक समजल्या जाणा-या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्याचेकौशल्य आघाडीच्या हॉटेल्स व बेकरींमधले शेफ्स यांनी दाखवले.
मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एग्झिबिशन सेंटरमध्ये २१ ते २३ ऑगस्ट, २०१७ असे तीन दिवस हा कार्यक्रम झाला. यामध्ये अमेरिकेतील फळांचे ठेवण्यात आली होती. यूएस प्रीमियम अॅग्रिकल्चरल प्रोडक्ट्सच्या उत्पादनांचे वेगळेपण आणि त्यामधील वैविध्य यांवर प्रकाश टाकणे ही यामागील कल्पना होती. यामध्ये अमेरिकेतील क्रॅनबेरीज, वॉशिंग्टन अॅपल्स,यूएसए पेअर्स, कॅलिफोर्निया वॉलनट्स आणि यूएस पेकन्स आदी फळे, सुकामेव्याची ओळख करून देण्यात आली.
अन्नाचा आस्वाद घेण्याची व पाककलेची (गोर्मे अॅण्ड क्विझिन) ही स्पर्धा तुफान यशस्वी ठरली. मुंबईतील ८०हून अधिक शेफ्स व मिक्सॉलॉजिस्ट्स या स्पर्धेत सहभागी झाले. यूएस क्रॅनबेरीज, वॉशिंग्टन अॅपल्स, यूएसए पेअर्स, कॅलिफोर्निया वॉलनट्स आणि यूएस पेकन्स ही यूएस अॅग्रिलकल्चरल प्रोडक्ट्सची उत्पादने मुख्य घटकपदार्थ म्हणून वापरत स्पर्धकांनी काही अत्यंत कल्पक पाककृती निर्माण केल्या. सेंट रेजिसचे योगेंद्र अदेप, जोइना परेरा, स्वधा कुथियाला आणि स्वप्नील अग्रे यांचा संघ गोर्मे स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आला. त्यांनी अॅपेटायझर म्हणून टुना टार्टर व व्हाइट अनियन व्हेलो सूप, मेन कोर्समध्ये हारेड लँब लुआ विथ ड्युओ ऑफ बीटरूट आणि बुराटा टार्टेलिनी, तर डेझर्ट म्हणून मेल्टिंग चॉकलेट विथ क्रॅनबेरी अॅण्ड कॅरामलाइझ्ड पेकन नट सॉइल असे पदार्थ तयार केले. मिक्सॉलॉजी स्पर्धेचे विजेते ठरले ड्रॉप बारचे ऑस्लिन गोन्साल्विस. त्यांनी अॅपल सिनॅमन अॅण्ड क्रॅनबेरी मोईतो हे पेय तयार केले. विजेत्यांनी केलेल्या पदार्थांना आणि पेयांना परीक्षक वजमलेल्या खवय्यांनी भरभरून दाद दिली.