मुंबई, दि. 11 : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत तपासणी करण्यासाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विशेष चौकशी समिती नेमली जाईल. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर जमीन गैरअधिसूचित झाल्याबद्दल आरोप करण्यात आले होते, याबाबतही स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.