मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत दरवर्षीं गणेश मुर्त्यांची संख्या वाढत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईत अनेक ठिकाणी कृत्रिम तलावे उभारून त्यात श्री गणेशाच्या मुर्त्या विसर्जन करण्याचे आवाहन केले. मात्र या आवाहनाकडे मुंबईकर नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
श्री गणेशाच्या बहुतेक मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. या मुर्त्या समुद्रात तलावात विसर्जन केल्याने त्यामधील पाणी प्रदूषित होऊन पाण्यातील जीवांना त्यापासून धोका निर्माण होतो. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा मुद्दा पुढे आल्याने २००७ मध्ये तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांनी महापौर बंगल्यासह मुंबईत ठिकठिकाणी कृत्रिम तलाव उभारून श्री गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. गेले १० वर्षे मुंबईत कृत्रिम तलावांमध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात येत आहे. गेल्या १० वर्षात पर्यावरण जनजागृतीसाठी महापालिका अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारत आहे. या कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशाच्या मुर्त्या विसर्जित कराव्या म्हणून गणेशभक्तांमध्ये जनजागृती केली जाते. मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौर स्वतः याबाबत आवाहन करत असतात. असे असतानाही गणेशभक्तांकडून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गणेशभक्तांकडून मात्र हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये २०१५ मध्ये कृत्रिम तलावात १०९९६ गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले होते. सन २०१६ मध्ये त्यात वाढ होऊन १३९२१ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले होते. यावर्षी मात्र यात घट झाली आहे. या वर्षी १३११३ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. यात ११४ सार्वजनिक तर १२९९९ घरगुती गणेशमूर्त्यांच्या समावेश आहे.
मुंबईत गणेशमुर्त्यांचे प्रमाण वाढले..
मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात बाजार केला जातो. यात दरवर्षी वाढ होत असते. मागील वर्षी ६८३५३ दिड दिवसाच्या गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले होते. यावर्षी त्यात ३०३९ मुर्त्यांची वाढ झाली आहे. यावर्षी दिड दिवसांच्या ७१३९२ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे.
कृत्रिम तलावातील गणेश मुर्त्यांचे विसर्जन..
सन घरगुती सार्वजनिक एकूण
2015 10,957 39 10,996
2016 13,766 155 13,921
2017 12,999 114 13,113