मुंबई । प्रतिनिधी -
भक्तांचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या गणरायाचे आगमन शुक्रवारी मुंबईत घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या मंडपात झाले. मोठय़ा थाटात विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन शनिवार पासून सुरु झाले असले तरी रविवारी पहाटे पर्यंत विसर्जन करण्यात आले. गणेशोस्तवाच्या आधीपासून मुंबईत पावसाने जोर पकडला असून भरपावसात मुंबईत ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले.

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा करणार्या भक्तगणांनी आज दीड दिवसासाठी विराजमान झालेल्या गणरायाला निरोप दिला. मुंबईतील समुद्रात, तलावात व पालिकेने ठीकठिकाणी निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यात आले. मुंबईत रविवारी पहाटेपर्यंत एकूण 71392 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवसाच्या आपल्या लडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तगणांच्या मुखातून एकच जयघोष होता तो म्हणजे गणपती बाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या. दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन भक्तगणांनी मोठ्या थाटात केले. शनिवारी 323 सार्वजनिक मंडळांनी तर 71069 घरगुती गणपती बसविणार्या भक्तगणांनी श्री गणेशाला निरोप दिला. पर्यावरणाचा विचार करत भक्तगणांनी कृत्रिम तलाव 13113 बाप्पाचे विसर्जन केले. यात 114 सार्वजनिक मंडळांनी तर 12999 घरगुती गणपती मूर्तींचा समावेश आहे.
कृत्रिम तलावांमधील विसर्जन
सन घरगुती सार्वजनिक एकूण
2015 10,957 39 10,996
2016 13,766 155 13,921
2017 13,113 114 12,999