दहिहंडीच्या दिवशी लाऊडस्पिकरचा आवाज "बंद" - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2017

दहिहंडीच्या दिवशी लाऊडस्पिकरचा आवाज "बंद"

मुंबई / प्रतिनिधी -
विविध सण, उत्सव आणि इव्हेन्टला लाइटिंग तसेच ध्वनी यंत्रणा उभारली जाते. अश्या यंत्रणा पुरवठा करणाऱ्या प्रोफेशनल ऑडियो अँड लायटिंग असोसिएशनने (पाला) 15 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मूक दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने होणाऱ्या समस्यांविरोधात 15 ऑगस्टला दहिहंडीच्या दिवशी लाउडस्पीकर आवाज म्यूट करत लायटिंग बंद ठेवली जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष रॉजर ड्रेग्रो यांनी शुक्रवारी प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

लाऊडस्पिकर बंदीमुळे ध्वनी व प्रकाश उद्योगाच्या भविष्यावर गंभीर प्रश्न उभे राहिले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या व्यवसाय़ांवर आणि त्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांवर थेट परिणाम होत असल्य़ाचे संघटनेने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या निर्णयाची चुकीची अमलबजावणी आणि ध्वनीप्रदूषणांवर सक्षम अधिका-यांना काही व्यक्तींनी सादर केलेली गैरसमजुतीची तथ्थे आदी कारणांमुळे राज्यव्यापी मूकदिनाचा निर्णय़ घेतला असल्याचे असोशिएशनने स्पष्ट केले आहे. हा संप राज्यव्यापी असणार असून या संपाला साऊंड व्यावसायिकांची मातृसंस्था असलेल्या 'पाला' या संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. राज्यातील लाउडस्पीकर बंदीमुळे ध्वनी व प्रकाश उद्योगाच्या भविष्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समारंभ किंवा कोणत्याही कारणांमुळे ७५ डेसिबल खाली आवाज स्तरावर काम करता येत नाही. ऑपरेटला इच्छा असली तरी आम्ही निय़माविरोधात जाणार नाही. या नियमाचे उल्लंघन होऊ नये, कायद्याचे पालन करण्याच्यादृष्टीने या दिवशी लाऊडस्पिकर म्यूटवर ठेवला जाणार आहे, असे रॉजर ड्रेग्रो यांनी सांगितले.

Post Bottom Ad