शिवसेना- भाजपच्या नगरसेविका भिडल्याचे पालिका साभागृहात पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2017

शिवसेना- भाजपच्या नगरसेविका भिडल्याचे पालिका साभागृहात पडसाद


मुंबई | प्रतिनिधी -
कचऱ्याचे डब्बे वितरण न केल्याने भाजपा व शिवसेनेच्या नगरसेविका आपसाद भिडल्या होत्या. याचे पडसाद सोमवारी पालिका सभागृहात उमटले. भाजपने शिवसेना डब्बा चोर, मोदी मोदी तर शिवसेनेने चोर है, चोर है च्या घोषणा दिल्या. या घोषणांमुळे सभागृहात मोदी डब्बा आणि चोर असा नाद घूमला होता. घोषणांबाजीचे रुपांतर बाचाबाजीत झाले आणि नंतर शिवसेना- भाजपच्या नगरसेविका आपसात भिडल्या. दहा मिनीटे सभागृहात गाेंधळ सुरु होता. या गोंधळातच महापौरांनी अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवल्याने वादावर पडदा टाकला.

चारकोप येथील शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी, सुमारे साडे पाच हजार कचऱ्यांच्या डब्ब्यांचे वितरण न करता गोदामात साठवून ठेवल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका अंजली खेडेकर यांनी हरकतीचा मुद्दा चर्चेला आणला. नगरसेविका दोशी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी केली. दोशी यांनी हे आरोप फेटाळून लावले. नगरसेवक निधीतून ५०० डब्बे मिळाले होते. त्यापैकी ४५० डब्ब्यांचे वितरण केले असून ५० डब्ब्यांचे वितरण करणे, बाकी असल्याचा खुलासा सभागृहात केला. मात्र, भाजपच्या नगरसेविकांनी हे डब्बे २०१५ ते २०१६ मधील असल्याचा आरोप केला. या आरोपांचे प्रभाग समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी खंडन केले. भाजपचे नगरसेवक प्रशासनावर दबाव आणण्यासाठी दमदाटी केली. अधिकाऱ्याला कोंडूनही ठेवले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची सुटका केली, अशी बाब त्यांनी सभागृहाच्या निर्दशनात आणून दिली. पारदर्शक सरकारची घोषणा करणाऱ्यांचे हेच का पारदर्शक कारभार, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. सभागृह नेते यशवंत जाधव यांनीही भाजपवर सडकून टीका केली. या टिकेचे पर्यवर्सन बाचाबाचीत झाले. भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना डब्बे चोर, मोदी- मोदींचा जयघोष भाजपने सुरु केला. शिवसेनेनेही ..चोर ..चोर अशा घोषणा देवून त्यास प्रत्युत्तर दिल्याने सभागृहात मोदी डब्बे चोर, मोदी डब्बे चोर असा सूर एेकायला येत होता. सभागृहात दहा मिनिट घोषणाबाजी सुरु होती. भाजपच्या नगरसेविका अंजली खेडेकर, ज्योती अळवणी आणि राजश्री शिरवाडकर आणि शिवसेनेच्या राजूल पटेल, किशोरी पेडणेकर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मंजुरी करिता पटलावर ठेवल्याने वातावरण निवळले.

आसावरी पाटील तुम्ही धमकी देता का - महापौर 
डब्बे वितरण न केल्याच्या प्रकरणावरुन शीतल म्हात्रे यांनी भाजपवर टीका करताना चारकोप क्रांती उद्यान जीमखान्यातील महत्वाचे कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली. दरम्यान, भाजपच्या नगरसेविका आसावरी पाटील यांनी महापौरांना उद्देशून पुटपुटल्या. महापौरांनी त्यांना हेरुन आसावरी पाटील तुम्ही मला धमकी देता का, असा जाब विचारला. मात्र, यानंतर थोडासा गोंधळ झाला आणि या मुद्द्याचे विषयांतर झाले

Post Bottom Ad

JPN NEWS