भेंडीबाजारमध्ये चार मजली इमारत कोसळली - 22 जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2017

भेंडीबाजारमध्ये चार मजली इमारत कोसळली - 22 जणांचा मृत्यू


मुंबई । जेपीएन न्यूज -
गेल्या महिन्याभरात मुंबईत इमारत कोसळण्याची तिसरी दुर्घटना घडली आहे. 25 जुलैला घाटकोपरमध्ये साईदर्शन ही इमारत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्याच आठवड्यात 26 ऑगस्टला चांदिवलीत इमारत कोसळली होती. या दुर्घटना ताज्या असतानाचा मुंबईतील भेंडीबाजार, पाकमोडिया स्ट्रीटवर म्हाडाची उपकरप्राप्त असलेली हुसेनी ही सात मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 60 ते 65 रहिवासी अडकल्याची भीती आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अद्याप 35 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दल व एनडीआरएफला यश आले असुन या दूर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत 13 जण जखमीं आहेत. बचाव कार्य करणारे 6 कर्मचारीही जखमी झाले आहेत. जखमींवर जे.जे. आणि सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसेनी (आरसी वाला) बिल्डिंग 117 वर्ष जुनी इमारत होती. तळमजला अधिक चार मजले अशी रचना असलेली ही इमारत गुरुवारी सकाळी आठ - साडे आठच्या सुमारास कोसळल्याची माहिती आहे. इमारतीत तळ मजल्यावर अनिवासी शाळा, पहिल्या मजल्यावर चार खोल्या तर इतर माळ्यावर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण 10 खोल्या आहेत. इमारतीत 9 कुटुंब राहत असून प्राथमिक माहितीनुसर 60 ते 65 लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आले असून जखमींवर जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु झालं आहे. एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढले जात आहे.

इमारत पडण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर इमारत सैयदना बुऱ्हानुद्दीन ट्रस्ट रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्टमध्ये होती. इमारतीला 353 ची नोटीस देण्यात आली होती. इमारतीच्या रिडेव्हल्पमेंटकरीता रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र रहिवाश्यांनी घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने ते त्याच ठिकाणी राहत होते. सकाळी इमारत कोसळली त्यावेळी इमारतीमधील शाळा सुरु असती तर मोठ्या प्रमाणात लोक आणि लहान मुले अडकली असती अशी भीती येथील स्तहनिक रहिवाश्यांनी बोलून दाखवली. या ठिकाणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भेट दिली असून या दुर्घटनेला म्हाडा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करुन दूर्घटनेची माहिती घेतली,जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश, दुर्घटनेच्या चौकशीचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत, देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची केली आहे.

जखमींवर जेजे आणि सैफी मध्ये उपचार -
पालिकेच्या आपतकालीन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या ढिगाऱ्या खालून 34 लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी जेजे हॉस्पिटलमध्ये 8 पुरुष व 1 महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जेजे रुग्णालयातून 2 पुरुष आणि 1 महिलेला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जेजे रुग्णालयातून एका रुग्णाने स्वतः डिस्चार्ज घेतला त्याने सैफी रुग्णालयात दाखल झाला आहे. बचाव करणाऱ्या अग्निशमन दलाचे 5 आणि एनडीआरएफचा 1 असे सहा जावं जखमी झाले असून २ जवानांना जेजे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर 4 जवानांना उपचार कलारून सोडण्यात आले आहे.

दुर्घटनाग्रस्त इमारतीला महापौरांनी दिली भेट -
भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत म्हाडाची होती. यामुळे इमारत कोसळून जी दुर्घटना झाली. त्यासाठी सर्वस्वी म्हाडा प्रशासन जबाबदार आहे. मुंबई महापालिका या घटनेला जबाबदार नाही, असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटले. तसेच राज्य शासनाने पुनर्वसनाचे धोरण निश्चित करावे, दुर्घटनेतील मृत्यूमुखींना आर्थिक मदत करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

गेल्या महिन्याभरातील तिसरी दुर्घटना - 
गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी 25 जुलै रोजी घाटकोपरमध्ये साईदर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

न्यायालयीन चौकशीची सपाची मागणी -
हुसैनी इमारतीच्या दुर्घटेनेची न्यायालयीन चौकशी करुन संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे पालिका गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यांनी दिली भेट -
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री रविंद्र वायकर, राज्यमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, आमदार आशिष शेलार, मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सचिन अहिर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, आमदार वारीस पठाण, भाजप , समाजवादी, नगरसेवक जावेद जुनेजा, अनंत नर, मनोज कोटक, अतूल शहा, समाजवादीचे नगरसेवक रईस शेख आदींनी घटनास्थळाला भेट दिली.

मृतांची नावे -
हसन आरसीवाला ४५
तसलीम आरसीवाला ४५
फातिमा सय्यद जाफर १४
नसिर अहमद २४
सय्यद जमाल जाफर १९
बच्चूआ २२
नसीर गुलाम शेख २५
सकीना चष्मावाला ५०
कयुम २५
रईस ५८
रिझवान २५
मुस्तफा शाह २२
नासिरुद्दीन अब्बास चष्मावाला ७१
हफीज मोहसीन शेख ३८
अल्ताफ हैदर मन्सुरी १२
अब्बास निजामुद्दीन चष्मावाला ४०
अहमदतुल्ला अब्बास चष्मावाला ३ महिने
अफजल आलं २०
रेश्मा
तीन मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. 
त्यापैकी एकाचे वय ३५ तर दुसऱ्याचे वय ३२ वर्षे असून
एकाचे नाव किंवा इतर काहीही माहिती मिळालेली नाही.


जेजे रुग्णालयातील जखमींची नावे -
तस्लिमा चष्मावाला ६३
फातिमा उमेदवाला ४६
अब्दुल लतीफ ४६
सईद अहमद ५३
गुलाम बोस २८
सलीम हुसेन ४१
इकबाल खान २३
सैफुद्दीन कुरेशी ६०
अहमद अली २१
खान कमरूल हसन उपचार करून सोडले
अफजल शेख उपचार करून सोडले
रुफिया ११ उपचार करून सोडले
जुजन हसन आरसीवाला २८ जेजे मधून सैफी मध्ये दाखल

Post Bottom Ad