पालिकेकडून निधी घेऊन नव्या बस विकत घ्या - रवी राजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 August 2017

पालिकेकडून निधी घेऊन नव्या बस विकत घ्या - रवी राजा


मुंबई / प्रतिनिधी - बेस्टच्या ताफ्यात नव्याने ३०३ बस घेण्यात येणार होत्या मात्र पालिकेने बेस्टला फक्त ९० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केल्याने फक्त १८५ बस विकत घेण्यात येणार असून उर्वरित ११८ बसेसची मागणी रद्द करण्यात येणार आहे. यावर पालिकेने भांडवली खर्चासाठी आर्थिक सहाय्य करण्याची तयारी दाखवली असल्याने पालिकेकडूनच निधी घेऊन या बसेस विकत घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे रवी राजा यांनी केली आहे,

बेस्टच्या ताफ्यातील दिवसेंदिवस कमी होत असल्याने रस्त्यावर कमी बस धावल्याने अनेक मार्गांवर प्रवाश्याना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नवीन बस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून ३०३ बस घेण्यासाठी टाटा कंपनीला ऑर्डर दिली. मात्र अर्थसंकल्पीय चर्चेत स्थायी समितीत बस घेण्यासाठी १०० कोटी मंजूर करण्यात आले होते. १०० कोटी पैकी १० करोड रुपये इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे उरलेल्या ९० कोटींमध्ये १८५ बसगाड्याच बेस्ट विकत घेऊ शकली. उरलेल्या ११८ बसगाड्यासाठी बेस्टला ५६ कोटींची आवश्यकता होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पालिका आयुक्तांनी बेस्टला आर्थिक मदत करण्यास नकार दर्शवल्याने उर्वरित बसगाड्यांची ऑर्डर रद्द करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आला होता. 

या प्रस्तावावर बोलताना भाजपा सदस्य सुनील गणाचार्य यांनी सरकारच्या तेजस्विनी योजने अंतर्गत ५० बस चालवायच्या आहेत, त्यासाठी सरकाकडून बेस्टला ११ कोटी रुपये, इलेक्ट्रिक बस साठी १० कोटी रुपये देण्यात आले. ३०३ बस वरील जकात म्हणून करोडो रुपये पालिकेला दिले जाणार होते. जकातीची रक्कम कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत व उर्वरित रक्कम पालिकेकडून सहाय्य म्हणून घेऊन ११५ बस खरेदी कराव्यात असे सांगितले.  शिवसेनेचे सदस्य सुहास सामंत यांनीही तेजस्विनी योजने अंतर्गत येणाऱ्या ११ कोटींचा निधी टाटाच्या उर्वरीत बसगाड्या खरेदी करण्यासाठी वापरण्यात यावा असे सांगितले. तर रवी राजा यांनी पालिकेने बेस्टकडून या नवीन बसखरेदी पोटी घेतलेले जकातीचे व इतर कर मिळून असे एकूण २६ कोटी रुपये पालिकेने माफ करावे, व ते पैसे नवीन बस खरेदीसाठी द्यावेत अशी सूचना केली. बेस्ट समितीला न विश्वासात न घेताच प्रशासनाने ११८ बस गाड्यांची ऑर्डर रद्द करून बेस्ट समितीचा अपमान केला जात असल्याने प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची उपसूचना रवी राजा यांनी मांडली.  

बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्टकडे नव्या बस खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. पालिका आयुक्त काहीही ऐकूण घेण्याच्या तयारीत नसल्याने पालिकेकडूनही बस खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत नीला मिळत नाही याकारणाने नवीन ११८ बसेस खरेदी करणे शक्य नाही. म्हणून ३०३ पैकी १८५ बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर करावा असे आवाहन केले. बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी बेस्टला तेजस्विनी, इलेक्ट्रिक बसची माहिती सदस्यांना द्यावी. अनंत गीते यांनी बेस्टला बस घेण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता हा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. पालिका नेहमी भांडवली खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्यास तयार आहे असे सांगत असल्याने बस खरेदी करण्यासाठी प्रशासनाने पालिका आयुक्तांना पत्र द्यावे असे निर्देश देत सादर प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवला. 

Post Bottom Ad