एका आठवड्यात रेल्वे अपघातात ५६ मृत्यू तर ७६ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 August 2017

एका आठवड्यात रेल्वे अपघातात ५६ मृत्यू तर ७६ जखमी


मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईकर नागरिकांची लाईफलाईन म्हणून प्रसिद्ध असलेली रेल्वे सध्या डेथलाईन ठरत चालली आहे. गेल्या आठवड्या भरात मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील विविध अपघातात ५६ प्रवासी मृयुमुखी पडले असून ७६ प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी एका दिवसात तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले. यापैकी बऱ्याच मृतांची ओळख पटलेली नाही.

रेल्वेने दिवसभरात ७५ लाख प्रवासी प्रवास करत असून अपघात होऊ नयेत म्हणून अनेक प्रकार प्रवाश्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तरीही रेल्वे अपघातात कमी झाल्याचे आकडेवरुन स्पष्ट होत आहे. ट्रेनमधून पडणे, खांबांना धडकणे, ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, रुळांवर आत्महत्या करणे इत्यादी कारणे अपघातांच्या मागे आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात झाल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. सीएसटीएम ५, दादर १, कुर्ला ८, ठाणे २, डोंबिवली १, कल्याण ६, कर्जत २, वडाळा ७, वाशी २, पनवेल ०, चर्चगेट १, मुंबई सेंट्रल १, वांद्रे ३, अंधेरी ०, बोरीवली १०, वसई रोड ४, पालघर ३ असे एकूण ५६ प्रवासी मृत झाले आहेत. तर सीएसटीएम ७, दादर १, कुर्ला ४, ठाणे ४, डोंबिवली ३, कल्याण ११, कर्जत १, वडाळा ५ , वाशी २, पनवेल ०, चर्चगेट ३, मुंबई सेंट्रल ११, वांद्रे ०, अंधेरी ७, बोरीवली ८, वसई रोड ४, पालघर ५ असे एकूण ७६ प्रवासी जखमी झाले आहेत.

Post Bottom Ad