मुंबईला पावसाने झोडपले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2017

मुंबईला पावसाने झोडपले


24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई । प्रतिनिधी
मुंबईत श्रीगणेशाच्या आगमनासोबत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रोज सुरु असलेल्या पावसाने सोमवारी मुंबईला चांगलेच झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाने सुरुवात केल्याने नोकरी निमित्ताने बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल झाले. शहर व उपनगरांतील सखल भागात काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. दुपारी 3 वाजपर्यंत शहरांत 30.92 मिमी, पूर्व उपनगरांत 15.56 मिमी आणि पश्चिम उपनगरांत 12.42 मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.

जुलैच्या अखेरीस दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टच्या प्रारंभी जोरदार हजेरी लावली. अधून मधून जोेरदार सरी व संततधार कायम ठेवत पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला. मागील चार दिवसापासून शहर व उपनगरांत पावसाची बॅटींग सुरू आहे. रविवारी काहीशी विश्रांती घेऊन सोमवारी दिवसभर पुन्हा जोरदार संततधार कोसळला. दादर टीटी, हिंदमाता, परळ, कुर्ला, शीव, चेंबूर घाटकोपर, वांद्रे, अंधेरी सबवे, काझी सय्यज स्ट्रीट आदी सखळ भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे वाहतूकही 15 ते 20 मिनीटे उशिरा धावल्याने प्रवाशांचे हाल झाले. महापालिकेने पाणी उपसा पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा केला. समुद्राला भरती असल्याने महापालिकेनेही यंत्रणा सज्ज ठेवली होती. गणेशोत्सवानिमित्ताने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली. सार्वजनिक गणेशोत्वाच्या मंडपाबाहेर रांगा लावलेल्या गणेश भक्तांनी भर पावसांत गणेशाचे दर्शन घेतले.

तीन ठिकाणी घरांच्या भिंतीची पडझड -
संततधार पावसामुळे तीन ठिकाणी घरांच्या भिंतीची पडझड झाली. यांत जुहू येथील समुद्र गुप्त या इमारतीच्या तिस-या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू असताना सिलींगचा काही भाग कोसळून दीनानाथ यादव (50) हे जखमी झाले. त्यांना पालिकेच्या कूपर रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर पश्चिम उपनगरांत चार ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या. तर पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

मंगळवारी समुद्राला भरती -
येत्या 24 तासांत जोरजार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पहाटे 4.52 वाजता 3.29 मीटर आणि सायंकाळी 4.48 मिनिटांनी 3.23 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. समुद्राला भरती असल्याने नागरिकांनी खबरदारी म्हणून समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Post Bottom Ad