मराठा मोर्चा वरून परतणाऱ्या २ जणांचा मृत्यू - एक गंभीर जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2017

मराठा मोर्चा वरून परतणाऱ्या २ जणांचा मृत्यू - एक गंभीर जखमी


मुंबई / प्रतिनिधी -
मराठा मोर्चावरून परतणाऱ्या तरुणांना वडाळा येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन मोर्चेकरांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. विनायक ढगे (२३), सिद्धेश म्हसे (२५) अशी मृत तरुण मोर्चेकरांची नावं आहेत. तर सिद्धार्थ चव्हाण (२२) हा तरुण गंभीर जखमी आहे. त्याला मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईत बुधवारी (९ ऑगस्ट) मराठा मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावरून संध्याकाळी सहाच्या सुमारास विनायक ढगे, विल्सम जोसेफ, सिद्धेश म्हसे आणि सिद्धार्थ चव्हाण हे मोटरसायकलवरून चेंबूर येथे घरी परतत होते. भक्ती पार्क येथून विनायक आणि विल्सन हे आयमॅक्स चित्रपटगृहाच्या दिशेनं जात असताना भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाजवळ थांबले. हे तिघेही भक्ती पार्कातील मोनो रेल बसस्टॉपच्या रस्त्याच्या दुभाजकावर बसले होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या (एमएच ४६ एच ५९७१) या क्रमांकाच्या ट्रकनं त्यांना धडक देत ट्रक दुभाजकावर चढला. या अपघातात विनायकचा जागीच मृत्यू झाला आहे. सिद्धेश म्हसे आणि सिद्धार्थ चव्हाण गंभीर जखमी झाले. त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सिद्धार्थ म्हसे याचा मृत्यू झाला. तर सिद्धार्थ चव्हाणची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक मोहम्मद कलीम शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात घडला त्यावेळी शेखनं मद्यपान केल होत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

मेट्रोच्या खड्ड्यात पडून दोन मोर्चेकरी जखमी - 
बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा मूक मोर्चासाठी साताराच्या पाटण तालुक्यातील रहिवासी असलेले हनुमंत पाचपुते गावातील मित्रांसह आले होते. आझाद मैदानात मेट्रोच्या कामासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्याच्या बाजूला योग्य प्रकारे बॅरिकेट्स लावले नव्हते. मोर्चाला गर्दी असल्याने मेट्रोच्या कामाच्या बाजूला पाचपुते उभे होते. त्यांच्या शेजारी नवी मुंबई कोपरखैराणे येथील अनिल बेलोसे हे सुद्धा त्यांच्या कुटुंबीयांसोबत मराठा मोर्चात सहभागी झाले होते. मैदानात वाढत्या गर्दीच्या धक्क्याने या दोघांचा तोल जाऊन खड्ड्यात पडले. त्यांच्या पायाला मुक्का मार लागला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी दोघांनाबाहेर काढले. या दोघांनाही आधाराशिवाय चालता येत नसल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. रुग्णालयात दोघांच्या पायांचे एक्स-रे काढल्यानंतर दोघानांही पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

Post Bottom Ad