एमआयडीसीच्या जमिनींबाबत उद्योगमंत्र्यांच्या माहितीत विसंगती - जयंत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 August 2017

एमआयडीसीच्या जमिनींबाबत उद्योगमंत्र्यांच्या माहितीत विसंगती - जयंत पाटील


मुंबई – दि. ८ ऑगस्ट २०१७
आज सभागृहात विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी या सर्व प्रकरणांची कागदपत्रेआणि फाईल माझ्याकडे उपलब्ध असून मंत्र्यांच्या माहितीत विसंगती स्पष्ट दिसत असल्याचा आरोप सभागृहात केला.

याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की उद्योगमंत्र्यांनी केलेल्य खुलाशात म्हटले आहे की शेतकऱ्यांचा विरोध आहे अशा जमिनी वगळण्यात आल्या, एमआयडीसीचे क्षेत्र विखुरलेले आहे,इगतपुरी भागात शेतकऱ्यांनी तीन कोटीपर्यंत परतावा मागितला अशी कारणे दिली आहे. यावर समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्येही तीन कोटीपेक्षा जास्त परतावा मागतायत म्हणून प्रकल्प रद्द करण्याचे सरकारचे धोरण आहे का, असा प्रश्न पाटील यांनी केला. स्वस्तिक बिल्डरने जो उद्योग विभागाला अर्ज दिला आहे त्यात अजय अंबालाल नाहर या गरीब शेतकऱ्याने अर्ज केला, हे अजय, नाहर डेव्हपर्लसचे चेअरमन आहेत अशी माहिती पाटील यांनी सभागृहाला दिली. याचाच अर्थ उद्योगपतींनी आधी शेतकऱ्यांकडून एमआयडीसीच्या जमीन विकत घेतली आणि पुन्हा जमीन परत मिळण्यासाठी अर्ज केला असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आघाडी सरकारच्या काळात राजेंद्र दर्डा आणि नारायण राणे यांनी अशी जमीन विकासकांना दिल्याचा आरोप केला होता. यावरही जयंत पाटील यांनी सांगितले की, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार या जमिनी सोडण्यासाठी विरोध केला होता. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणेंनी या फाईलवरच या जमिनी वगळण्याला केलेला विरोध मान्य केला होता अशी माहिती सभागृहात दिली. यावर शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळास सुरुवात केली.

Post Bottom Ad