समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करणार - एकनाथ शिंदे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 August 2017

समृध्दी महामार्गासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करणार - एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या स्वेच्छेने संपादीत करण्यात आल्या आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी एकूण घेण्यासाठी स्वत: भेट देणार असून, संबंधित जमिनधारकांशी चर्चा करुन व त्यांचे म्हणणे विचारात घेऊन या महामार्गाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. याबाबतची लक्षवेधी सदस्य संजय दत्त यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, समृध्दी महामार्ग सुधारणा अधिनियम २०१६ नुसार या प्रकल्पाच्या आखणीमध्ये समाविष्ट जमिनीबाबत जमीन एकत्रिकरण योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गत जमीन एकत्रीकरण योजनेत शेतकऱ्यांच्या जमिनी ऐच्छिक संमतीने घेण्यात येणार आहेत. तसेच ऐच्छिक संमती प्राप्त न झाल्यास अशा भूधारकांच्या जमिनी राज्य शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे भूसंपादन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी भूसंपादनास विरोध केला आहे. अशा ठिकाणी स्वत: जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार आहे. या चर्चेत सदस्य जयंत जाधव, सुनील तटकरे यांनी सहभाग घेतला.

Post Bottom Ad