खोटे जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्या टुलिप मिरान्डा यांचे नगरसेवकपद धोक्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2017

खोटे जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्या टुलिप मिरान्डा यांचे नगरसेवकपद धोक्यात


मुंबई | प्रतिनिधी - 17 August 2017 -
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ९० मधून टुलिप मिरान्डा या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले जात प्रमाणपत्र जिल्हा समितीने रद्द केले आहे. यामुळे टुलिप मिरान्डा यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

काँग्रेस नगरसेविका टुलिप मिरान्डा या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ९० मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. निवडणुकीवेळी त्यांनी ईस्ट इंडियन या जातीचे जात प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या जातीविरोधात वॉर्ड क्रमांक ९० च्या नगरसेवकापदासाठी उभ्या असलेल्या बेनिडिक्ट केणी यांनी तक्रार अर्ज केला होता. त्यांनी मिरान्डा यांनी त्यांच्या दाव्या पृष्टार्थ त्यांच्या आत्याचे खोटे व बनावट कागदपत्र सादर केल्याचे नमूद केले आहे. मिरान्डा यांनी ज्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती तेच जात पडताळणी समिती मुंबई यांनी अवैध ठरविल्याने मिरान्डा यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे टुलिप मिरान्डा यांच्या विरोधात बेनिडिक्ट केणी यांनी तक्रार दाखल केली होती. केणी यांच्या वतीने त्यांचे वकील चिंताणणी भनगोजी व अ‍ॅड. मुल्ला यांनी बाजू मांडल्याचे सांगण्यात आले.

Post Bottom Ad