महापालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी विष्णू सोनवणे यांची निवड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2017

महापालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी विष्णू सोनवणे यांची निवड


मुंबई । प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या सन २०१७- २०१९ साठी पालिका मुख्यालयात झालेल्या निवडणुकीत दै. सकाळचे विष्णू सोनवणे यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी आयबीएन लोकमतच्या प्रणाली कापसे व सुनिल शिंदे यांचा पराभव केला. सन २०१२ नंतर पाच वर्षांनी हि निवडणूक झाली. यामुळे पत्रकारिता क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.

वार्ताहर संघाच्या निवडणुकीसाठी आयबीएन लोकमतच्या प्रणाली कापसे यांनी "आमच पॅनल" उभे करून हि निवडणूक लढवली होती. या पॅनलमधून अनेक मोठ्या बॅनरच्या पत्रकारांना उमेदवार म्हणून संधी दिली होती. मात्र पत्रकारांनी बॅनरवाल्या आमच पॅनलला सपशेल नाकारत पालिका वार्ताहर संघात कार्यरत असलेल्या पत्रकारांना निवडून दिले आहे. वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीतील १५ पैकी १२ जागांवर वार्ताहर कक्षात सतत कार्यरत असलेले पत्रकार निवडून आले आहेत.

निवडून आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्षपदी मारुती मोरे (दै. तरुण भारत संवाद), कुणेश दवे (गुजरात समाचार), सरचिटणीस पदी श्रीरंग सुर्वे (दै.लक्षदीप - दै. जनशक्तिी), सहचिटणीसपदी भालचंद्र देव (दै. पुण्यनगरी), रईस अहमद (उर्दू टाइम्स), खजिनदारपदी इंद्रायणी नार्वेकर (दै. सामना), स्टेफी थेवर (डेली आफ्टरनून) आणि कार्यकारिणी सदस्यपदी संजय जाधव (दै. पुण्यनगरी), काशिनाथ म्हादे (दै. नवशक्ति), लक्ष्मण सिंह (मिड- डे), राधिका यादव (दै. मुंबई हलचल), सुजाता ठाकूर (दै. खबरे आजतक), विनायक डावरुंग (टीव्ही ९), मोहम्मद मुकीम शेख (दै. राष्ट्रीय अधिकार) हे निवडून आले आहेत. पालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विजय खबाले यांनी नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले. निवडणूक अधिकारी म्हणून श्रीपाद नाईक आणि विजय तारी यांनी निवडणुकीची प्रक्रिया राबविली.

Post Bottom Ad