मुंबई (प्रतिनिधी ) - भीम आर्मीचे संस्थापक प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद यांच्यावर सहारनपुर येथील कारागृहात झालेला हल्ला तसेच राज्यातील मागासवर्गीयांवरील अत्याचाराबाबतचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील भीम आर्मी .संघटनेच्या वतीने आज ३ ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात जावून मोठ्या प्रमाणावर निवेदने देण्यात आली.
राज्य आणि देशातील मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी भीम आर्मी ही सामाजिक संघटना मागील सहा वर्षापासून काम करीत आहे या संघटनेचे संस्थापक प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद एका सामाजिक प्रकरणात उत्तर प्रदेशातील सहारनपुर कारागृहात आहेत. यासंदर्भातील कायदेशीर लढाई संघटनेच्या वरिष्ठ पातळीवर सुरु असतानाच मागील आठवड्यात काही लोकांनी आझाद यांच्यावर कारागृहात हल्ला करून त्यांच्या जीवाला अपाय करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती भीम आर्मीचे प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली . या प्रकारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले .या प्रकरणासोबतच महाराष्ट्रात देखील नांदेड जिल्हा कुशिनागर, कोपर्डी तालुका मांडवा येथील दलित मुलींवरील बलात्कार व अत्याचाराच्या घटनाप्रकार घडल्या असून या सर्व. प्रकरणाचा जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयात जावून निषेध नोंदाविण्यात आला.
अॅड.चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करून आझाद यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी तसेच त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत मराठवाड्यातील नांदेड कुशिनागर या ठिकाणी तसेच मांडवा (कोपर्डी) येथील मागासवर्गीय मुलींवर बलात्कार व अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा करण्यात यावी,त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी.स्वप्नील सोनावणे (नेरूळ -नवी मुंबई ) खून खटला विशेष न्यायालयात चालविण्यात यावा .मागासवर्गीयांवरील अन्याय, अत्याचाराचे सर्व खटले विशेष न्यायालयात चालविण्यात यावेत .त्याचप्रमाणे अॅट्राॅसिटी अॅक्ट कायदा 2017 मधील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या भीम आर्मी णे केल्या आहेत सदर मागण्याचे निवेदन आज मुंबईत प्रदेश प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी सत्यनारायण बजाज यांना देण्यात आले . यावेळी रमेश बालेश, विजय भिडे, संतोष वाकळे संदेश दवणे उमेश गायकवाड यांचाय्सः बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ठाणे येथे जिल्हा संघटक राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी वंदन सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. रायगड जिल्ह्यातून प्रदेश उपप्रमुख रणधीर आल्हाट, व सुखदेव डावरे यांच्या नेतृत्वात पनवेल कलेक्टर यांन नेदन देण्यात आले यावेळी स्वप्नील सोनावणे याचे आईवडील शहाजी व गौरी सोनावणे हेदेखील उपस्थित होते नाशिकमध्ये जिल्हा प्रमुख केतन पगारे, कैलास पगारे वंदनाताई पवार व रंजनाताई भालेराव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी रामचंद्र खेडकर यांना निवेदन देवून मागण्या करण्यात आल्या.
अहमदनगर येथे येथे शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन दिले तर प्रदेश उपप्रमुख दीपक भालेराव व विलास साळवे यांच्या नेतृत्वात शिर्डी तहसीलदार यांना निवेदन दिले परभणी येथील नायब तहसीलदार यांच्याकडे प्रदेश संघटक मनोहर वावळे यांच्या नेतृत्वात वकील अनिल सावंत विशाल मास्जे विजय साळवे व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले लातूर येथे अरुण धरे, हिंगोलीत आनंद खैरे, यांच्या नेतृत्वात निवेदने देण्यात आली. या जिल्ह्यांसह राज्यातील सोलापूर मध्ये सोनकांबळे, अमरावतीत सुधीर नाईक , नागपूर , मालेगाव , पुणे , पिंपरी चिंचवड अकोला , सह राज्याती सर्वच जिल्ह्यात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने निवेदने देवून आपला रोष व्यक्त केला