मुंबई । प्रतिनिधी -
श्री गणेशाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले असतानाच मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अनेक मंडळांना परवानगीच मिळाली नसल्याने उत्सव साजरा करायचा कसा असा प्रश्न कार्यकर्त्याना भेडसावत आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसर पालिकेकडे २४ विभागातून १३१२ गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८५ मंडळानाच मंडप उभारण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. ७४ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे तर अद्यापही ११५३ मंडळांच्या परवानगीसाठीचे अर्ज प्रलंबित आहेत.
पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार ए विभागातील ३६ पैकी ३६, बी विभागातील २७ पैकीं २४, सी विभागातील ५४ पैकी ४२, डी विभागातील ८८ पैकी ७८, इ विभागातील ३१ पैकी २१, एफ साऊथ विभागातील २१ पैकी २१, एफ नॉर्थ विभागातील ७४ पैकी ५९, जी साऊथ विभागातील ८६ पैकी ८६, जी नॉर्थ विभागातील १०९ पैकी ७८, एच इस्ट विभागातील ६६ पैकी ५९, एच वेस्ट विभागातील २६ पैकी २५, के इस्ट विभागातील ५८ पैकी ५४, के वेस्ट विभागातील ६३ पैकी ५२, पी साऊथ विभागातील ६० पैकी ४९, पी नॉर्थ विभागातील ९४ पैकी ७२, एल विभागातील ३६ पैकी ३२, एम इस्ट विभागातील ८३ पैकी ८३, एम वेस्ट विभागातील ५५ पैकी ५०, एन विभागातील ४८ पैकी ४०, एस विभागातील ३४ पैकी ३१, टी विभागातील ३८ पैकी ३८, आर साऊथ विभागातील ४५ पैकी ४५, आर सेंट्रल विभागातील ५७ पैकी ५७, आर नॉर्थ विभागातील २३ पैकी २३ मंडळांना अद्याप परवानगीच मिळलेली नाही.
मुर्तीकारांनाही परवानगी नाही - श्रीगणेशाच्या मुर्त्या बनवणाऱ्या ५१८ मूर्तिकारांनी मंडप उभारणीसाठी पालिकेकडे अर्ज केले होते. त्यापैकी पालिकेने फक्त १५५ मूर्तिकांरांच्या मंडपाना परवानगी दिली आहे. १६१ मंडपाना परवानगी नाकारण्यात आली तर अद्याप २०१ मूर्तिकरांना मंडप उभानिसाठीचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.