10 वर्षांपासून रखडलेले टेक्सटाइल म्युझियम मार्गी लागण्याची शक्यता -
मुंबई / प्रतिनिधी -
काळाचौकी येथील केंद्र सरकारच्या युनायटेड टेक्सटाईल मिल क्रमांक2 व 3 च्या भूखंडावर मुंबई महापालिकेकडून टेक्सटाइल म्युझियम उभारले जाणार आहे. या टेक्सटाइल म्युझियमच्या सल्ल्यासाठी जे.जे.कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यातआली आहे. जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या सल्ल्यासाठी पालिका 17 कोटी 25 लाख रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सादर प्रस्ताव मंजूर झाल्यास मागील दहा वर्षांपासून कागदावर राहिलेले टेक्सटाइलम्युझियम मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेने जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांची सल्लागारम्हणून निवड केली आहे. प्रस्थापित सल्लागारांना बाजूला ठेवतमहापालिकेने जे. जे. कॉलेजची मदत घेण्याचा चांगला निर्णय घेतलाअसल्याची चर्चा आहे. म्युझियमचे जे.जे. कॉलेजच्या देखरेखीखाली हेकाम होणार आहे. काळाचौकी येथील युनायटेड मिल क्रमांक २ व ३ चीजागा एनटीसीकडून महापालिकेला हस्तांतरीत करण्यात येत असूनयाठिकाणी महापालिकेच्यावतीने टेक्सटाइल म्युझियम उभारण्याच्यानिर्णय घेतला आहे. त्यासाठी टेक्सटाइल म्युझियम बनवण्यासाठीसल्लागाराची निवड करण्यात आली असून सल्लागार सेवेसाठी जे. जे.कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला सुमारे १७ कोटी रुपये दिले जाणार आहे. यासल्लागार नियुक्तीला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीमिळाल्यानंतर प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
या म्युझियमच्या माध्यमातून मुंबईच्या कापड गिरणी व गिरणीकामगारांच्या कामाचा इतिहास प्रतिबिंबीत केला जाणार आहे.म्युझियमच्याआधारे या गिरणींचे जतनही केले जाणार आहे. मनोरंजनमैदानाचा कापड उद्योग ग्राम या संकल्पनेवर विकास करण्यात येणारअसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. म्युझियमच्याया कामासाठी पुरातन वास्तूंच्या नुतनीकरणाचा अनुभव असलेल्यामहापालिकेचे प्रस्थापित सल्लागार इच्छुक होते. काहींची नियुक्तिहीकरण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र या कामाचे महत्त्व व अनुभवलक्षात घेता सल्लागार म्हणून सरकारी उच्च दर्जाची संस्था म्हणून सरजे.जे. कॉलेज ऑफ ऑर्किटेक्चर यांना सल्लागार म्हणून नियुक्तीकरण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.